जाहीर केलेली कर्जमाफी फसवी.. विठ्ठलराव शेळके

राहाता (वार्ताहर)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल जाहीर केलेली कर्जमाफी फसवी

 असल्याची प्रतिक्रिया अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे पत्रकात शेळके यांनी म्हटले आहे.

 की विधानसभा निवडणुकीत भाजप व महायुतीतील मित्रपक्ष यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून सातबारा उतारा कोरा करू असे आश्वासन दिले होते परंतु कालची कर्जमाफी फारच अटी शर्ती ठेवण्यात आल्या यात सप्टेंबर 2025 ही तारीख धरली यात अनेक शेतकरी वंचित रहाणार आहे राज्यातील अनेक शेतकरी बऱ्याच वर्षांपासून कर्जबाजारी झाले आहे यात अनेक शेतकरी यांनी आत्महत्या केल्या आहेत आजही ते सत्र सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी यांची तोंडची पाने पुसली आज कुठल्याही शेतमालाला भाव मिळत नाही केंद्र व राज्य सरकार शेतमालाची निर्यातबंदी करून भाव पाडण्याचा डाव आखत आहे अतीवृष्टीने पिकाचे नुकसान झाले यात तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली त्यातदेखील काही शेतकरी वंचित आहेत विमा रक्कम विमा कंपनी शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत देत नाही विमा कंपनी वर सरकार व लोकप्रतिनिधी यांचा वचक नाही या कर्जमाफी विरोधात राज्यात शेतकरी संघटना प्रहार संघटनेचे बच्चु कडू मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी व विरोधी महाविकास आघाडीचे सर्व मित्र पक्ष यांनी आपले मतभेद विसरून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठे आंदोलन उभारावे लागेल असे मत विठ्ठलराव शेळके यांनी मांडले आहे शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील शेतमाल विनाशुल्क आयात करण्याचा घाट घातला आहे हे भाजप सरकार शेतकरी विरोधी असल्याने शेतकऱ्यांनी संघटीत व्हावे असे आवाहन शेळके यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments