विजय बोडखे राजुरी वार्ताहर
प्रवरा अभिमत विद्यापीठ हे देशात अग्रगण्य विद्यापीठ म्हणून नावारूपाला आले आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या विचारानेच डॉ. राजेंद्र विखे पाटील यांचे कार्य सुरू असून अतिशय समर्पित भावनेने काम करून लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांची ग्रामीण आरोग्याची व वैद्यकिय शिक्षणाची स्वप्नपुर्ती केली असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
प्रवरा ईन्स्टिट्युट ऑफ मेडीकल सायन्सेस या अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर होते. याप्रसंगी श्रीमती शकुंतलाताई नरवडे, नाशिक विभागाचे महानिरीक्षक दत्ता कराळे, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, सेवानिवृत्त महानिरीक्षक बी.जी. शेखर, विश्वस्त सौ. सुवर्णाताई विखे पाटील, स्वप्निल सावंत, विश्वस्त मोनिका सावंत, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विष्णू मगरे, आमदार सत्यजित तांबे, कल्याणराव आहेर, पंजाबराव आहेर, विश्वस्त ध्रूव विखे पाटील, कुलसचिव डॉ. रवींद्र लावरे आदी उपस्थित होते डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त हार-तुरे किंवा महागड्या भेटवस्तू न स्विकारता, गरजू मुलांसाठी शैक्षणिक साहित्य देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला समाजातील विविध स्तरांतून प्रचंड प्रतिसाद मिळाला. जमा झालेले हे साहित्य लवकरच गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहे.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, आरोग्य आणि शिक्षणाच्या या मंदीराचे पावित्र्य अतिशय प्रामाणिकपणे डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी जपले असून सामान्यमाणूस केंद्रीभूत माणून त्यांची आरोग्यसेवा मनोभावे व सेवाभावीपणे करीत आहेत. कोवीड काळात अतिशय उत्कृष्ठ काम या विद्यापीठामार्फत झाले असून, इतरांसाठी तो एक मोठा आदर्श ठरलेला आहे. राजकारणाच्या पलिकडे जावून लोकसंचय करीत विद्यापीठाची वाटचाल अतिशय वेगाने व अत्याधुनिकतेकडे घेवून जात आहे. ग्रामीण जनतेला जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा देण्याची डॉ. राजेंद्र विखे पाटील यांची सततची धडपड कौतुकास्पद असल्याचे ना. विखे यांनी सांगितले.
डॉ. पराग काळकर म्हणाले की, प्रवरा अभिमत विद्यापीठाच्या रूपाने प्रवरानगर सारख्या ग्रामीण भागात शिक्षणाचे एक मोठे अभनिव दालन सुरू आहे. ही संस्था सातत्याने जगतिक दर्जा पाळत दिमाखात सूरू आहे. डॉ. राजेंद्र विखे पाटील यांचे सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला देखील मोठे योगदान लाभले आहे. प्रवरानगरच्या मातीला कामाचा सुगंध आहे असे सांगुण ते म्हणाले की, डॉ. राजेंद्र विखे हे स्वतःच एक माणूसकीचे विद्यापीठ असून आपल्या कार्यामध्ये त्यांनी कधीच राजकारण आणले नाही. त्यांची दूरदृष्टी मोठी असून लवकरच प्रवरा ही संस्था रिसर्च हब म्हणून नावारूपास येईल यात तिळमात्र शंका नाही.
सुरूवातीला कुलगुरू डॉ. व्ही.एन.मगरे यांनी प्रास्तविक केले. कुलसचिव डॉ. रवींद्र लावरे यांनी आभार मानले. यावेळी ट्रक्स वाहतूक संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर राठी, प्रवरा बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, माणिकराव आहेर, पोलिस उप अधिक्षक अमोल भारती, सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments