येडूआईच्या मानाच्या काठीची उद्या हनुमंतगाव ते धानोरे भव्य मिरवणूक

क्षेत्र पिंपळदरी( वार्ताहर)

श्री क्षेत्र पिंपळदरी येथील येडूआईची मानाची काठी राहता तालुक्यातील हनुमंतगाव मधून पिंपळदरी कडे उद्या मार्गस्थ होणार असून हनुमंतगाव ते धानोरे या गावापर्यंत येडूआईच्या काठीची भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. 
      संपूर्ण राज्यातील भिल्ल समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र पिंपळदरी येथील येडूमातेची यात्रा 3 एप्रिल रोजी मोठ्या भक्ती भावामध्ये साजरी होत आहे संपूर्ण राज्यातून लाखो भिल्ल समाज या यात्रेसाठी उपस्थित असतो. राहता तालुक्यातील हनुमंतगाव येथील मानाच्या काठीला या यात्रेत विशेष महत्त्व असते.गेल्या अनेक वर्षापासून या मानाच्या काठीला देवीच्या मंदिरामध्ये स्थान देऊन तिची विधिवत पूजा केली जाते त्यामुळे हनुमंतगावच्या मानाच्या काठीला खूप महत्त्व निर्माण झाले आहे. या मानाच्या काठीच्या दर्शनासाठी भिल्ल समाज उत्सुक असतो. त्यामुळे हनुमंतगावातून उद्या २७ मार्च रोजी या मानाच्या काठीची मिरवणूक हनुमंतगाव ते धानोरे या गावपर्यंत काढली जाणार आहे त्यानंतर संध्याकाळी धानोरे घाट या ठिकाणी काठीचा मुक्काम होईल व दुसऱ्या दिवशी सकाळीच ही मानाची काठी पिंपळदारीकडे रवाना होईल . हनुमंतगाव मधील चारी नंबर एक येथून अनेक वर्षापासून ही मानाची काठी पिंपळदरीला दर्शनासाठी जात असते त्यामुळे येडूआईची मानाची काठी म्हणून या काठीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या मिरवणूकी‌ मध्ये एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे, एडवोकेट किसनराव कोतकर, कारखान्याचे संचालक अशोकराव घोलप, संजय अनाप, सनी अहिरे,संदीप गावडे, वसंत घोलप, बबलू अनाप, गोरक्ष घोलप, गोरक्षनाथ ब्राह्मणे, सुभाष ब्राह्मणे, अतुल कुलकर्णी, विजय गोधडे, रोहित अहिरे ,अमोल अहिरे, रामा बर्डे, गोरक्ष निकम, सुरेश पिंपळे, संदीप पिंपळे ,कृष्णा बर्डे ,निलेश पिंपळे ,ज्ञानेश्वर पिंपळे ,रमेश पिंपळे ,समर्थ बर्डे, राजेंद्र पिंपळे ,अनिल पिंपळे, मच्छिंद्र घोलप, अशोक पिंपळे ,नितीन निकम, गोरख अहिरे, जालिंदर अहिरे, मच्छिंद्र अहिरे, अंबादास बेळे, अरुण शिंदे, राजेंद्र पिंपळे, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

Post a Comment

0 Comments