नवी मुंबई (प्रतिनिधि) : भारतीय माजी सैनिकांचे राष्ट्रीय नेते , सैनिक फेडरेशन महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष, महाराणी येसुबाईंच्या माहेरकडील राजेशिर्के घराण्याचे वंशज शंभुसेना प्रमुख मा. श्रीमंत दिपकराजे शिर्के साहेबांना त्यांच्या प्रशासकीय, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, गडकिल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा जपणे आदी विशेष कार्याची दखल घेत राजेशिर्के यांना छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती छावा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अमित गडांकुश सर यांनी दिली.
छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार - २०२६ पुरस्कार प्रदान सोहळा वाशी नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला असून सदर पुरस्कार प्रत्येक वर्षी विशेष शिव-शंभुकार्य करणाऱ्यांना दिला जातो. मागील २०२५ चा पुरस्कार नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज सुभेदार कुणाल मालुसरे यांना दिला गेला होता. तर २०२६ यावर्षीचा पुरस्कार महाराणी येसुबाईंचे ( स्वराज्यनिष्ठ श्रीमंत गणोजीराजे पिलाजीराजे शिर्के घराण्याचे) वंशज श्रीमंत दिपकराजे शिर्के यांना दिला जाणार आहे.
पुरस्कार सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून ऐतिहासिक राजघराण्यांसह सरदार घराण्यातील प्रमुख वंशज मान्यवर तसेच आय.पी.एस. अधिकारी मा. दिपक साकोरे साहेब, मुंबई पोलिसचे डी.सी.पी. मा. डॉ. राज खतीब साहेब, डी.वाय.एस.पी. ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै. विजय चौधरी साहेब, सुप्रसिद्ध मराठी अभिनेते मा. विजय पाटकर, रोहित पोपट पिसाळ आदि मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती छावा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. डॉ. अमित गडांकुश यांनी दिली आहे. तरी सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन छावा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
शंभुसेना प्रमुख मा. दिपकराजे शिर्के साहेबांना पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल शिर्के घराणे कोअर कमिटी, श्रीमंत पिलाजीराव राजे शिर्के रथ सोहळा, शंभुसेना संघटना , गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट महाराष्ट्र राज्य , ऐतिहासिक राजघराणे व सरदार घराणे वंशज संघटना, राष्ट्रवादी माजी सैनिक सेल, विविध माजी संघटना, महाराणी श्रीमंत येसुबाई सेवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, स्वराज्य निष्ठावंत श्रीमंत पिलाजीराजे शिर्के प्रतिष्ठान महाराष्ट्र , स्वराज्यनिष्ठ श्रीमंत गणोजीराजे शिर्के स्मृती समिती , राजाऊ रेजिमेंट, गणोजी रेजिमेंट, इतिहास प्रेमींसह शिव-शंभुभक्तांनी अभिनंदन केले आहे.
0 Comments