मराठा सोयरीक संस्थेचा नगर जिल्ह्यात लोणी खुर्द तालुका-राहता येथे मोफत आधुनिक वधु-वर मेळावा.*



  लोणी (-प्रतिनिधी,)

 जगदंब फाउंडेशन संचलित मराठा सोयरीक संस्थेचा नगर जिल्ह्यात मोफत वधू वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती श्री.प्रकाश जोंधळे,(तालुका समन्वयक जगदंब फाउंडेशन राहाता), श्री.गणेश लंघे (अध्यक्ष जगदंब फाउंडेशन), श्री अशोक कुटे(संस्थापक अध्यक्ष मराठा सोयरीक संस्था) यांनी दिली.

     १०६ वा मोफत वधू वर मेळावा राहाता तालुक्यात लोणी खुर्द येथील वरद विनायक सांस्कृतिक भवन, पिंपरी निर्मळ रोड,ता. राहाता जि. अ.नगर. येथे मंगळवार ३१ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
 या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.ना.सौ. शालिनीताई विखे पाटील(माजी जि.प.अध्यक्ष अनगर), ह. भ. प. श्री. उद्धव महाराज मंडलिक(मठाधिपती वरद विनायक देवस्थान) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या मुली स्वतः हजर असतील त्या मुलींना कायमस्वरूपी मोफत स्थळे संस्थेकडून सुचवले जातील तसेच भव्य अशा स्क्रीनवर मुला-मुलींचे चांगले फोटो दाखवले जातील. जास्तीत जास्त मुला-मुलींच्या पालकांनी मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. सचिन निर्मळ, श्री सदाशिव गावडे,श्री. संदीप गावडे, श्री माणिक धनवटे,मा.डॉ. श्री संजय उबाळे,श्री नारायण जाधव, श्री कैलास कोते, श्री सर्जेराव घोडके,श्री सचिन आहेर,श्री सुरेश नळे श्री.दत्ता गायकवाड, श्री अमोल साळवे, श्री. सुधाकर आंत्रे, श्री कैलास तळोले यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ८८४७७२४६८० या क्रमांकावर संपर्क करावा.


 कृपया प्रसिद्धीसाठी 
 अशोक पांडुरंग कुटे 
संस्थापक अध्यक्ष मराठा सोयरीक संस्था 
मो. नं. ९८५०२०३९१४

Post a Comment

0 Comments