टाकळीभान प्रतिनिधी टाकळीभान : टाकळीभान येथील पुरातन श्रीराम मंदिरात आज गुरूवार दिनांक २६ रोजी दुपारी १२. ३० वाजता फुलांची उधळण करून व पाळण्याची दोरी ओढून श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
श्रीराम मंदिरात गुढी पाडवा ते श्रीराम नवमी या दरम्यान श्रीराम नवमी उत्सव साजरा केला जातो. या निमित्त हारीपाठ, भजन, अखंड हरीनाम सप्ताह आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
श्रीराम नवमी निमित्त सकाळी ६ वाजता प्रभू श्री रामचंद्रांना गंगाजलाने स्नान व अभिषेक करण्यात आला. सकाळी १० ते
११ या दरम्यान दिंडी काढून दिंडीची ग्राम प्रदक्षिणा झाल्यावर ११ ते १२ या दरम्यान भजन होवून दुपारी बरोबर १२.३० वाजता वसुंधरा, सुदाम, वैदीक, स्वानंदी देवळालकर यांनी पाळण्याची दोरी ओढून श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला जन्मानंतर भाविकांनी फुलांची उधळन करून प्रभू रामचंद्रकी जयचा जय जयकार केला. नंतर आरती होवून
भाविकांना प्रसाद देण्यात आला. श्रीराम नवमी निमित्त श्रीरामाच्या दर्शनासाठी व जन्मोत्सावासाठी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्रीराम नवमी उत्सव उत्साहात साजरा करण्या साठी मंदिराचे प्रमुख डॉ. श्रीकांत भालेराव, डॉ. सोनल भालेराव, डॉ. वैभव भालेराव, श्रीराम जोशी, महिला व पुरूष भजनी मंडळ व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments