दिलीप शिंदे
सोयगाव दि.१४-- सोयगाव वनक्षेत्रातून गौण खनिज माती मिश्रित वाळू चा अवैध उपसा करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर जप्त करून ट्रॅक्टर मालकावर दि.१४ शनिवारी सोयगाव वन परिक्षेत्र कार्यालयात वन गुन्हा दाखल करण्यात आल्याने वनक्षेत्रातून गौण खनिज अवैध उपसा करून वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.वन विभागाने धडाकेबाज कारवाई केल्याने जनतेतून वनविभागाचे कौतुक केले जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, वेताळवाडी पश्चिम वन कक्ष क्रमांक ४८२ गट नंबर ८१ या वनक्षेत्रात एक ट्रॅक्टर गौण खनिज माती मिश्रित वाळू चा अवैध उपसा करून वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती वन कर्मचाऱ्यांना मिळाली त्यावरून कृष्णा धोत्रे वनरक्षक वेताळवाडी पश्चिम, सनान्से वनरक्षक वेताळवाडी पूर्व,चौधरी वनरक्षक सोयगाव,तडवी वनरक्षक जरंडी व वन कर्मचारी यांनी सापळा रचून अवैध गौण खनिजाची उत्खनन करून वाहतूक करीत असलेले बिगर नंबरचे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर व ट्रॉली ज्याचा चेसीस क्रमांक १०००९४६८ ऐके असून त्यास वन कर्मचाऱ्यांनी अडवून जप्त केले.सदरील ट्रॅक्टर हे आरोपी गोपाल सदाशिव इंगळे रा.सोयगाव ता.सोयगाव यांचे मालकीचे असून आरोपी गोपाल सदाशिव इंगळे याच्या विरूद्ध अवैध गौण खनिज उत्खनन करून विना परवाना वाहतूक करीत असल्याबद्दल नियमाप्रमाणे आरोपी विरुद्ध वनगुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदरील वाहन जप्त करून वनपरिक्षेत्र कार्यालय सोयगाव येथे आणण्यात आले.सदर गुन्ह्याची कारवाई वनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा उप वनसंरक्षक सुवर्णा माने सहाय्यक वनसंरक्षक एस. आर.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ,सोयगाव वनपाल पी. डी.कोळी,वेताळवाडी पश्चिम वनरक्षक धोतरे,सोयगाव वनरक्षक चौधरी,वेताळवाडी पूर्व वनरक्षक सनान्से, जरंडी वनरक्षक तडवी यांनी कारवाई केली असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांनी दिलेल्या प्रेस नोट मध्ये म्हटले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सोयगाव वनपाल पी. डी. कोळी हे करीत आहे.
0 Comments