महाराणी येसुबाईंची प्रतिमा भेट देण्याचा अभिनव उपक्रम ;राजेशिर्के घराण्याकडून धर्मवीरगडावर येणाऱ्यांचा सन्मान



पुणे (प्रतिनिधि) : श्रीगोंदा तालुका, अहिल्यानगर जिल्ह्यातील ऐतिहासिक पेडगांव येथील किल्ले धर्मवीरगडावर (बहादुरगडावर ) तसेच गडावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या "शौर्यस्थळास" भेट देणाऱ्या, विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा व शिव-शंभुभक्तांचा इथून पुढे शंभुपत्नी महाराणी येसुबाईंच्या ( स्वराज्यनिष्ठ श्रीमंत गणोजीराजे पिलाजीराजे शिर्के यांच्या ) वंशजांकडून महाराणी येसुबाईंची (शाहूमाता राजाऊंची ) व छत्रपती शंभुराजांची प्रतिमा भेट देऊन अनोख्या पद्धतीने स्वागत व सन्मान करण्याचा संकल्प केला आहे. 


या स्तुत्य उपक्रमाची संकल्पना राजेशिर्के घराण्याचे वंशज तथा राष्ट्रवादी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष शंभुसेना प्रमुख दिपकराजे शिर्के व पत्रकार, इतिहास अभ्यासक तथा गडदुर्ग संवर्धक लक्ष्मीकांत राजेशिर्के यांची आहे.

     यापुढे किल्ले धर्मवीरगडावर भेट देणारे पत्रकार, सोशियल मीडिया चालक, इतिहास अभ्यासक, लेखक, गडदुर्ग संवर्धक, गडदुर्ग संवर्धन संस्था , पर्यावरण संस्था, सामाजिक संघटना , शिक्षण संस्था, शाळा, कॉलेज, कलाकार, अभिनेते , व्याख्याते, शाहीर , किर्तनकार, प्रबोधनकार, राजघराण्यातील वंशज मान्यवर, सरदार घराणे, व शूरवीर मावळ्यांच्या वंशजांसह शिव-शंभुभक्तांना येसुबाईंची प्रतिम भेट देऊन सन्मान करणार असल्याचे धर्मवीरगड संवर्धक लक्ष्मीकांत राजेशिर्के यांनी सांगितले. या माध्यमातून महाराणी येसुबाई व स्वराज्यनिष्ठ श्रीमंत राजेशिर्के घराण्याचा वास्तव इतिहासाचे प्रबोधन करण्याचा उद्देश आहे. 

      या अनोख्या उपक्रमाचा प्रारंभ नुकताच राजेशिर्के यांचे वडिल तथा भिमा काठचा ढाण्या वाघ म्हणून परिचित असलेले राजेशिर्के घराण्याचे आदर्श व्यक्तिमत्व चेअरमन पै. कै. गणपतराव राजेशिर्के यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधात किर्तनकार ह.भ.प. सुखदेव महाराज ननवरे यांना स्वराज्यनिष्ठ श्रीमंत पिलाजीराजे शिर्के यांच्या राजकन्या तथा शिवस्नुषा, शंभुपत्नी महाराणी येसुबाई व छत्रपती थोरले शाहूराजांच्या राजमाता राजाऊंची प्रतिमा भेट देऊन अनोख्या उपक्रमाची सुरूवात केला आहे. किल्ले धर्मवीरगडावर येण्यापूर्वी मान्यवरांनी व्याख्याते लक्ष्मीकांत गणपतराव राजेशिर्के यांच्या मोबाईल वर ९६२३६८४८९८ वर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. 

जय जिजाऊ (जिजाबाई) , जय राजाऊ (येसुबाई)..!
जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहूराजे..!
जय पिलाजीराजे, जय गणोजीराजे..!
जेंव्हा जेंव्हा गडावर मान्यवर येतात तेव्हा तेव्हा सन्मान होणार आहेत त्यामुळे तारीख उल्लेख नाही कायम प्रतिमा भेट देणाऱ आहोत.

Post a Comment

0 Comments