येडूआई यात्रेच्या पार्श्वभूमीवर ‌प्रशासन व आदिवासी नेत्यांमध्ये अकोल्यात बैठक

लोहगाव ( वार्ताहर)
 श्री क्षेत्र पिंपळदरी येथील येडू मातेच्या यात्रेनिमित्त प्रशासनाने‌ बैठक आयोजित केली असून या बैठकीला प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह भिल्ल समाजाच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
येडूआई यात्रेच्या पार्श्वभूमीवर ‌प्रशासन व आदिवासी नेत्यांमध्ये अकोल्यात बैठक
‌. अकोले तालुक्यातील श्री.क्षेत्र पिंपळदरी येथील येडूमातीच्या यात्रेला २ एप्रिल पासून सुरुवात होत आहे. त्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था व यात्रेच्या नियोजनासाठी तसेच यात्रा काळात प्रशासनाकडून कोणकोणत्या उपाययोजना राबवायच्या या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी अकोले तहसीलदारांनी १७ मार्च रोजी ११ वाजता अकोले तहसील कार्यालय येथे संबंधित सर्व शासकीय अधिकाऱ्यांसह आदिवासी भिल्ल समाजाच्या प्रमुख नेत्यांना बैठकीसाठी बोलवण्यात आले‌ आहे.

 या बैठकीमध्ये केवळ यात्रेच्या विषयावर चर्चा होणार असून आदिवासी नेत्यांनी केलेल्या मागण्यांवरही‌ सखोल चर्चा होणार आहे. या बैठकीला शासनाकडून गट विकास अधिकारी अकोले, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास विभाग कार्यालय ,राजुर पोलीस निरीक्षक अकोले ,उपभियंता जि.प. सां.बा. उपविभाग अकोले क्र. २ ,अभियंता जि. प .सा .बा .उपविभाग अकोले ,उपअभियंता म. रा. वि.वि .क .अकोले, उपअभियंता दूरसंचार विभाग अकोले, आगार व्यवस्थापक अकोले/संगमनेर ,निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग संगमनेर/अकोले,सरपंच ग्रामपंचायत पिंपळदरी, ग्रामसेवक /पोलीस पाटील पिंपळदरी, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन सर्जेपुरा रंगभवन अहिल्यानगर, अध्यक्ष येडूमाता देवस्थान ट्रस्ट पिंपळदरी ,वनपरिक्षेत्र अधिकारी अकोले (प्रादेशिक),मंडलाधिकारी ब्राह्मणवाडा /तलाठी चास /पिंपळदरी, वैद्यकीय निरीक्षक ग्रामीण रुग्णालय अकोले,कार्यकारी संचालक अगस्ती साखर कारखाना अकोले (अग्निशमन विभाग) या अधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलवण्यात आले आहे तर आदिवासी भिल्ल समाजाच्या प्रमुख नेत्यांपैकी ज्ञानेश्वर अहिरे, दिलीप बर्डे, कैलास माळी, सुभाष पवार, शिवाजीराव गांगुर्डे, संजय बर्डे,बाळासाहेब गांगुर्डे, राधाकृष्ण बर्डे, देविदास पवार, अनिल बर्डे, भास्करराव बर्डे, भाऊराव अहिरे, ज्ञानेश्वर निकम, अंकुशराव बर्डे, रंगनाथ आहेर, संपतराव मोरे, साईनाथ बर्डे, संजय गांगुर्डे, चंद्रकांत धिरोडे, मधुकर निकम, आप्पा बर्डे, युवराज बर्डे, मच्छिंद्र निकम, नामदेव पवार, नारायण माळी, भाऊसाहेब माळी, संजय खुरसणे, आदी पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार असल्याने या बैठकीकडे राज्यातील भिल्ल समाजाचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments