सैलानी दर्गा येथे अंधश्रद्धा पोटी शेकडो झाडांना ठोकले जातात खिळे, अनेक वृक्ष कोलंमडली, झाडांच्या वेदनांवर अखेर फुंकर--




दिलीप शिंदे 
सोयगाव दि.१४-- विदर्भाच्या बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी येथे प्रसिद्ध दर्गा आहे. देश भरातील भाविक तेथे नवस, मन्नत पूर्ण करण्यासाठी अमावस्या, पौर्णिमा व यात्रे निमित्त येतात. भूत, प्रेत, करणी, अंगात येणे आदी साठी हे ठिकाण सर्वश्रुत आहे.या ठिकाणी हिंदू बहुसंख्य तर थोडया बहुत संख्येत इतर धर्मीय ही दर्शनास येतात. आपल्या अंगातील दुखणे, व्याधी, संकट निवारण्या साठी येथे ही दुष्ट शक्ती खिळ्या त उतरवली जाते व हे खिळे, काळी बाहुली, बिब्बा तेथील झाडांना ठोकने ही प्रथा येथे अनेक वर्षांपासून सुरु आहे. या अंधश्रद्धा पायी होणाऱ्या खिळे ठोकन्यामुळे तेथील अनेक वृक्ष कोसळले आहेत तर अनेक वृक्ष कोसळण्याच्या मार्गावर आहे. दर्गा परिसरातील सर्व झाडांना लाखो खिळे ठोकण्यात आले असून त्यांचे वजन ६ ते ७ क्विंटल इतके भरेल. सिल्लोड येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे जिल्हा सह कार्यवाह (गतीविधी - पर्यावरण ) व अभिनव प्रतिष्ठान चे पर्यावरण रक्षक डॉ. संतोष पाटील यांनी बुलढाणाचे डी. एफ. ओ. सरोज गवस मॅडम ,वनपरीक्षेत्र अधिकारी सुनील वाकोडे यांना लेखी निवेदन दिले आहे. स्वतः पाटील यांनी काही झाडांचे खिळे काढून वेदना मुक्त केले आहे. त्यांनी वन विभागास विनंती अर्ज केला आहे की खिळे मुक्त करण्याची व्यापक मोहीम राबवावी. सर्व झाडांना उंच जाळी लावण्यात यावी. दुकानदारा कडे उपरोक्त साहित्य विक्रीसाठी ठेवण्यास प्रतिबंध करावे व यावर व्यापक जनजागृती पर अभियान राबवावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वनविभागाच्या तथा शासनाच्या "महाराष्ट्र ट्री फिलिंग ऍक्ट १९६४"नुसार झाडांना इजा करणे, खिळे ठोकणे गुन्हा असून प्रतिबंधीत आहे.       
सैलानी दर्गा येथे अंधश्रद्धा पोटी शेकडो झाडांना ठोकले जातात खिळे, अनेक वृक्ष कोलंमडली, झाडांच्या वेदनांवर अखेर फुंकर--
              प्रतिक्रिया:- लवकरच विशाल मोहीम--- - वनविभाग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थानिक स्वयंसेवक, मी स्वतः ही सर्व वृक्ष संपदा जतन व वेदनामुक्त व्हावी म्हणून "खिळे मुक्त वृक्ष" ही विशाल मोहीम पुढील सप्ताहात राबविणार आहे.श्रद्धेस आमचा विरोध नाही मात्र झाडं ही देव स्वरूप असतात, त्यांचे पर्यावरण व संस्कृती मध्ये मोठे योगदान असते म्हणून सर्व विचाराच्या लोकांना सोबत, समजूतदारीने ही अनिष्ठ बाब बंद होऊ शकते.
       ....... डॉ. संतोष पाटील, सोयगाव - सिल्लोड

Post a Comment

0 Comments