प्राध्यापक ज्ञानेश्वर बनसोडे यांची संपादक पत्रकार असोसिएशन च्या महाराष्ट्र राज्य सदस्य पदी नियुक्ती

प्राध्यापक ज्ञानेश्वर बनसोडे यांची संपादक पत्रकार असोसिएशन च्या महाराष्ट्र राज्य सदस्य पदी नियुक्ती

    राहाता (प्रतिनिधी,) संपादक पत्रकार असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या सदस्य पदावर 
प्रा.ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.   अध्यक्ष इस्माईल शेख यांनी त्यांची ही नियुक्ती केली असुन त्यांच्या या पत्रकारितेतील व सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
 . ज्ञानेश्वर बनसोडे हे गेल्या काही वर्षापासून पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न. जनसामान्यांच्या समस्या तसेच समाजातील विविध घडामोडी जनतेसमोर मांडण्याचे काम प्रामाणिकपणे करत असुन विविध प्रकारच्या दैनिकातून ते थोर महा पुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त सतत लिखाण करत असून समाज प्रबोधनाचे कार्य करत असतात. त्यांच्या या कार्यतत्परता व पत्रकार क्षेत्रातील संघटन कौशल्य.अचूक अशी अलंकारिक व मार्मिक शब्दटिप्पणी ;संघटन कौशल्य; आणि पत्रकारिता क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय योगदानाची दखल घेत पत्रकार असोसिएशनने त्यांची महाराष्ट्र राज्य सदस्य पदी निवड केली आहे.प्रा ज्ञानेश्वर बनसोडे यांनी सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात विशेष अशा प्रकारची उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे त्यांना विशेष मान्यवरांच्या हस्ते व उपस्थित अनेकदा गौरविण्यात आले आहे.
प्रा ज्ञानेश्वर बनसोडे हे मुळातच छत्रपति शाहू. फुले.आंबेडकर यांच्या व आदी थोर महापुरुषांच्या विचारांनी प्रभावित झालेले एक प्रामाणिक व बौद्धिकचातुर्य क्षमता असलेले आंबेडकर वादी चळवळीतील एक प्रभावी असे वादळी वेक्तीमत्व म्हणून प्रा ज्ञानेश्वर बनसोडे यांची परिसरात विशेष अशी ख्याती आहे.त्यांच्या या सर्व बाबींची दखल घेत पत्रकार अशोशिएशनणे त्यांची महाराष्ट्र राज्य सदस्य पदावर निवड केली आहे.

 त्यांच्या या निवडीमुळे परिसरातील पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा मिळत आहेत. आगामी काळात संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी तसेच पत्रकारांच्या हक्क व विविध प्रश्नांसाठी ज्येष्ठ पत्रकार बांधवांना सोबत घेऊनच एकजुटीने काम करणार असल्याचे प्रा.ज्ञानेश्वर बनसोडे यांनी सांगितले. दरम्यान त्यांच्या या निवडीबद्दल पत्रकार बांधव. मित्रपरिवार व विविध क्षेत्रातील सामाजिक संघटनेकडून त्यांचें अभिनंदन करण्यात येत आहे.



 . 


 ..

Post a Comment

0 Comments