टाकळीभान -प्रतिनिधी - श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे हिंदू धर्म परंपरा, संस्कृती आणि मुल्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी रविवार दि. 15 मार्च 2026 रोजी सायं 6 वाजता भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा या ठिकाणी करण्यात आले .
या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून मा. श्री. सुनीलजी काळे (धर्म जागरण प्रांत सदस्य) हे उपस्थित राहून धर्मकार्य विषयी मार्गदर्शन करणार आहेत तर ह.भ.प. हरीशशरणगिरीजी महाराज श्री क्षेत्र बाजाठाण, परमपूज्य गुंफेकर बाबा (भोकर आश्रम ), ह. भ. प. संतोष महाराज पटारे ( भोकर), ह. भ. प. सुदाम महाराज चौधरी (खोकर ), ह. भ. प. कृष्णा महाराज वाघुले ( टाकळीभान ) हे प्रमुख संत मंडळी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे संध्याकाळी सहा ते आठ या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य व दीपक कुमार वाघ यांचा स्वरदीप गीत गाण्याचा कार्यक्रम तसेच आठ ते नऊ हिंदू संमेलनाचा कार्यक्रम होऊन त्यानंतर भावी भक्तांना महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे तरी हिंदू समाजातील प्रत्येक बांधव व भगिनींनी कुटूंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संमेलनाची शोभा वाढवावी. अशी नम्र विनंती सकल हिंदू मराठा समाजाकडून केली जात आहे .
0 Comments