दिलीप लोखंडे
टाकळीभान प्रतिनिधी :-टाकळीभान येथे बसस्थानक परीसरात छञपती शिवरायांच्या जयंतीला उभाण्यात आलेल्या आश्वारुढ पुतळ्याच्या सुशोभिकरणासाठी ग्रामस्थांकडुन आर्थिक मदतीचा ओघ चांगलाच सुरु झाला आहे. टाकळीभान येथे छञपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा ही गेली चाळीस वर्षांपासुन मागणी होती. गावाचे राजकारण करणाऱ्या स्थानिक गावपुढार्यांकडे शिवप्रेमींची सातत्याने मागणी होत होती. अनेक ग्रामसभांमध्येही ही मागणी केली जात होती. गेली चाळीस वर्षे ग्रामपंचायतीचे सत्ताधारी गटाकडुन आश्वासन दिले जात होते माञ कृती होताना दिसत नव्हती. या आश्वासनांच्या दलदलीत सार्वजनीक ठिकाणच्या जागांवर अतिक्रमणाचा पाऊस पडला माञ छञपतीचा पुतळा राहुन गेला होता.
नुकत्याच पार पडलेल्या छञपतींच्या ६ मार्च रोजी साजरी केलेल्या जयंती निमित्त शिवभक्त बाळराजे आवारे पाटील यांच्या आर्थिक सहकार्यांने बसस्थानक परीसरात भव्य २० फुटी आश्वारुढ पुतळा साकारला गेला आहे. या पुतळ्यामुळे शिवभक्तांमध्ये उत्साह संचारल्याने भव्य स्वरुपात शिवजयंती साजरी केली गेली. प्रत्येक घरातील माणुस या आनंद सोहळ्यात सहभागी झाला होता. पुतळ्याच्या चारही बाजुने आकर्षक सुशोभिकरण करावे यासाठी अनेक हात पुढे सरसावले आहेत. अनेक शिवभक्त आर्थिक मदतीसाठी पुढे आले आहेत. लग्न समारंभात सत्काराला फाटा देवुन तर वाढदिवसाचा खर्च टाळुन थेट छञपतींच्या पुतळ्याच्या सुशोभिकरणासाठी स्वखुशीने देणगी दिली जावु लागली आहे. अनेक वर्षाचे स्वप्न पुर्ण झाल्याने पुतळ्याच्या सुशोभिकरणासाठी मदतीचा चांगलाच ओघ सुरु झाला आहे.
0 Comments