त्रिमूर्ती विद्यालयात दहावी-बारावीचे उन्हाळी वर्ग उत्साहात सुरू




टाकळीभान प्रतिनिधी :- त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, घोगरगाव येथे इयत्ता दहावी व इयत्ता बारावीचे उन्हाळी वर्ग उत्साहपूर्ण वातावरणात सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांचा अभ्यास पक्का होणे, निकालाची गुणवत्ता वाढविणे तसेच स्पर्धात्मक परीक्षांची तयारी दृढ करणे या उद्देशाने विद्यालयात हा विशेष उपक्रम राबविण्यात आला आहे.

        उन्हाळी वर्गांत विद्यार्थ्यांना विषयानुसार मार्गदर्शन, सराव कार्यपत्रिका, मॉडेल प्रश्नपत्रिका, पुनरावृत्ती चाचण्या आणि शंका समाधान सत्र यांचे नियोजन करण्यात आले आहे. अनुभवी शिक्षकवृंद विद्यार्थ्यांना वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शन देत आहेत.
हा उपक्रम प्राचार्य संतोष जावळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली,
इयत्ता बारावीचे विभाग प्रमुख नितीन साळवे सर
इयत्ता दहावीचे विभाग प्रमुख संदीप काळे सर
यांच्या प्रभावी नियोजनामुळे यशस्वीपणे राबविला जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीयरीत्या वाढली असून पालकवर्ग व ग्रामस्थांकडून विद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
   विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्रिमूर्ती विद्यालयाने राबविलेली ही मोहीम अत्यंत उपयुक्त ठरत असून पुढील काळातही अशाच गुणवत्तावर्धक उपक्रमांची अंमलबजावणी सातत्याने करण्यात येईल, अशी माहिती विद्यालय व्यवस्थापनाने दिली आहे.

Post a Comment

0 Comments