टाकळीभान प्रतिनिधी:-अहिल्यानगर जिल्हा पोलीस घटकाचे आस्थापनेवर पोलीस शिपाई संवर्गाच्या एकूण ७३ रिक्त पदांकरीता लेखी परिक्षा दिनांक १५/०३/२०२६ रोजी सकाळी ११.०० ते १२.३० वाजता न्यू कॉमर्स बिल्डिंग, न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, बॉईज हॉस्टेल गेट, बालिकाश्रम रोड, अहिल्यानगर येथे घेण्याचे नियोजीत होते.
तथापी सदर लेखी परिक्षेच्या वेळेमध्ये प्रशासकिय कारणास्तव अंशतः बदल करण्यात येत असुन पोलीस शिपाई भरती २०२४ २५ ची लेखी परिक्षा त्याच दिवशी दिनांक १५/०३/२०२६ रोजी सायंकाळी ०४.०० ते ०५.३० या वेळेत घेण्यात येणार आहे. उमेदवारांना लेखी परिक्षेच्या २ तास अगोदर दुपारी ०२.०० वाजेपर्यंत परिक्षाकेंद्रावर उपस्थीत रहाण्याबाबत कळविण्यात येत आहे. तसेच दुपारी ०३.३० नंतर परिक्षाकेंद्रात प्रवेश दिला जाणार नाही याची सर्व उमेदवार यांनी नोंद घ्यावी. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे त्यांनी केले आहे,
0 Comments