महंत राजराजेश्वरी आत्मारागिरीजी महाराजांच्या नवीन शिवरुद्राक्ष मुकुटाचे पूजन व परिधान सोहळा विधीवत गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर होणार!



शिर्डी (प्रतिनिधी)- 
गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा मंगलमय प्रारंभ मानला जातो. या पवित्र दिवशी नवीन संकल्प, धर्मकार्य आणि आध्यात्मिक उपक्रमांची सुरुवात करण्याची परंपरा आहे. याच शुभ मुहूर्तावर महंत श्री राजराजेश्वरी आत्मारामगिरी हे शिवतत्त्वाचे प्रतीक असलेला विशेष शिव रुद्राक्ष मुकुट पूजन करून परिधान करण्याचा पवित्र मानस व्यक्त करत आहेत.
हा मुकुट अत्यंत श्रद्धा, भक्तिभाव आणि आध्यात्मिक भावनेतून तयार करण्यात आला आहे. मुकुटाची रचना तांबे व पितळ धातूपासून करण्यात आली असून त्यावर सूर्य, ॐ, स्वस्तिक, त्रिशूल आणि डमरू या शिवतत्त्वाचे प्रतीक असलेल्या चिन्हांची सुबक नक्षी करण्यात आली आहे. या चिन्हांमुळे मुकुटाला धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
मुकुटावर 2100 पवित्र रुद्राक्ष सुशोभित करण्यात आली असून रुद्राक्ष हे भगवान शिवाचे अत्यंत प्रिय मानले जातात. त्यामुळे हा मुकुट शिवभक्तीचे प्रतीक ठरतो. याशिवाय मुकुटावर शुद्ध चांदीपासून बनवलेले “श्री” चिन्ह आणि अर्धचंद्र भगवान विराजमान करण्यात आले आहेत. “श्री” हे समृद्धी, मंगल आणि लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, तर अर्धचंद्र भगवान शिवाच्या जटांवरील दिव्य चिन्ह म्हणून ओळखला जातो.
गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी या मुकुटाचे वेदमंत्रांच्या उच्चारात ब्राह्मण देवतांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात येणार आहे. पूजनानंतर महंत श्री राजराजेश्वरी आत्मारामगिरी हे भक्तांच्या उपस्थितीत हा शिव रुद्राक्ष मुकुट परिधान करणार आहेत. या सोहळ्यामुळे शिवभक्तांमध्ये आध्यात्मिक ऊर्जा आणि भक्तिभाव जागृत होण्याची भावना व्यक्त केली जात आहे.
या पवित्र उपक्रमासाठी अनेक भाविक भक्तांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य व देणगी दिली आहे. त्यामुळे हा मुकुट केवळ अलंकार नसून भक्तांच्या श्रद्धा, सेवा आणि शिवभक्तीचे जिवंत प्रतीक ठरणार आहे.
गुढीपाडव्याच्या या शुभ प्रसंगी होणारा शिवरुद्राक्ष मुकुट पूजन व परिधान सोहळा भक्तांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरणार असून शिवतत्त्व, धर्मपरंपरा आणि आध्यात्मिक साधनेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणारा एक मंगलमय उपक्रम करणार आहे. असे श्री नर्मदेश्वर सेवाधाम ट्रस्ट, पिंपरी निर्मळ, तालुका राहाता यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments