दिलीप शिंदे
सोयगाव दि.०२-- सोयगाव जिल्हा परिषद शाळेच्या १९८९ च्या दहावीतील वर्गमित्र, मैत्रिणींच्या गेट टू गेदर कार्यक्रमाचे दि.३१ जानेवारी व दि. ०१ फेब्रुवारी असे दोन दिवसांचे आयोजन करण्यात आले होते. दि. ३१ जानेवारी रोजी सोयगाव शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले जागृत देवस्थान भैरवनाथ मंदिर येथे महाप्रसाद व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. भैरवनाथाचे दर्शन घेऊन सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी वन भोजनाचा आस्वाद घेतला. १९८९ मध्ये शाळा शिकत असतानाचे बालपण पुन्हा दि. ०२ रविवारी या माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी अनुभवले असून या कार्यक्रमात उच्च पदावर गेलेल्या अनेकांनी आपले अनुभव कथन केले.
दरम्यान फर्दापूर येथील हॉटेल तिरुपती येथे माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.यावेळी वैशाली महानोर व ज्योती पाखले यांच्या संकल्पनेतून फुल हौजी हा खेळ खेळण्यात आला.यात सर्वांनी सहभाग घेतला.प्रथम,द्वितीय व तृतीय विजेत्यांना संयोजकांतर्फे रोख रक्कम बक्षीस देण्यात आले. रतन फुसे व विठ्ठल काटोले यांच्या संकल्पनेतून गंमतीदार असलेला पाठीवर पुस्तक ठेवून चालत राहणे,शेवटी ज्याच्या पाठीवर पुस्तक राहील असे तीन विजेत्यांना ही रोख रक्कम बक्षीस देण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल काटोले यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी रतन फुसे, इंद्रजित खस, चंद्रशेखर कडीवाल,राजेंद्र शिनकर, संगीता सोयगावकर,वैशाली महानोर,ज्योती पाखले, विजय अहिरे,संतोष वाडेकर आदींनी परिश्रम घेतले. रतन फुसे यांच्याकडून उपस्थित माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींना तांब्याचा तांबा भेट म्हणून देण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments