दिलीप शिंदे
सोयगाव दि.०३ -- गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाचा गड असलेल्या पंचायत समिती निंबायती गणात पाच उमेदवार रिंगणात असल्याने चुरशीची लढत होणार आहे.
पंचायत समिती निंबायती गणात १४१६८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निंबायती गणात शिवसेनेने ( शिंदे गट) घोसला येथील सामाजिक कार्यकर्ते तथा मराठा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष,जनतेच्या सेवेत तत्पर असणारे सोपान गव्हांडे यांची पत्नी सविता सोपान गव्हांडे यांना रिंगणात उतरविले असून त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून (उबाठा) बोरमाळ तांडा येथील नाना देवबा साबळे, राष्ट्रवादी कडून (अजित पवार गट) तिडका येथील दशरथ सुरजिलाल झलवार, बहुजन समाज पक्षाकडून पहुरी येथील सामाजिक कार्यकर्ते व दांडगा जनसंपर्क असलेले हरीभाऊ तुकाराम पाटील तर भाजपा कडून रामपुरा तांडा येथील बद्री हजारी राठोड हे निवडणूक लढवित आहे. गेल्या वीस वर्षापासून बद्री हजारी राठोड यांच्या घराभोवती भाजपाचे राजकारण फिरत असल्याने गेल्या पंधरा वर्षापासून बद्री हजारी राठोड यांच्यासह कुटुंबातील व्यक्तींनी निंबायती गणाचे पंचायत समिती सदस्य म्हणून प्रतिनिधित्व केलेले असल्याने पुन्हा भाजपाने बद्री हजारी राठोड यांना रिंगणात उतरविल्याने गणातील मतदार नाराज असल्याचे चित्र दिसत आहे. पंधरा वर्षे निंबायती गणाचे पंचायत समिती सदस्य म्हणून प्रतिनिधित्व केलेले असून देखील निंबायती गणाचा हवा तसा विकास झालेला नसल्याची चर्चा मतदारांमध्ये रंगली आहे. निवडणुकी पुरते गावे पिंजून काढणारे उमेदवार,राजकीय नेते,कार्यकर्ते यांना मतदार राजांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने मतदारांचा कौल बदलत असल्याची चर्चा जनतेत सुरू झाली आहे. निंबायती गणात शिवसेना (उबाठा),काँगेस, राष्ट्रवादी (एस पी) व वंचित बहुजन आघाडी यांची युती असल्याने या गणात चुरशी लढत होणार आहे. बहुजन समाज पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष संघपाल सोनवणे यांचा असलेला दांडगा जनसंपर्क व बहुजन समाज पक्षाचे उमेदवार हरीभाऊ पाटील यांच्या प्रचारासाठी गावोगावी प्रत्येक मतदारांच्या भेटी घेऊन मतदारांना मतदान करण्याचे साकडे घालीत असल्याने याचा फायदा बसपाच्या उमेदवाराला होणार असल्याची चर्चा मतदारांमध्ये सुरु झालेली दिसत आहे. निंबायती गणाचे जातीय समीकरण बघता बहुजन समाज पक्षाने प्रचारात आघाडी घेतली आहे. पंचायत समितीच्या निंबायती गणात १४१६८ मतदार असून दि.०७ शनिवारी मतदार कुणाच्या बाजूने कौल देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
0 Comments