कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना टिफिन बॉक्स व टिफिन बॅग भेट !
शिर्डी (प्रतिनिधी)- राहाता तालुक्यातील गणेशनगर येथिल जि. प.प्राथमिक शाळा येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली, त्यावेळी शिवजयंतीचे औचित्य साधून हिंदुस्थान फिड्स कंपनीचे बारामती कॅटल फीड्स आणि ऍग्रो कंपनी श्रीरामपूर यांनी शाळेतील सर्व180 विद्यार्थ्यांना टिफिन बॅग व टिफिन बॉक्स भेट देऊन शिवरायांच्या कार्याला मानवंदना दिली.
शिवजयंतीच्या निमित्ताने शाळेतील मुलांनी छत्रपती शिवरायांची आणि राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा करून सुंदर अशी भाषणे केली. तसेच काही विद्यार्थ्यांनी पोवाडा, गाणी म्हटली. हिंदुस्तान फीड्स कंपनीचे मार्केटिंग ऑफिसर रवींद्र पवार म्हणाले की छत्रपती शिवरायांचे विचार आपण प्रत्यक्ष अमलात आणले पाहिजे.
समाजाचेप्रती आपले काही देणे लागते, या सदभावनेने कंपनीने विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप केले. दरवर्षी कंपनी सीएसआर फंडातून शालेय विद्यार्थ्यांना साहित्य देऊन आपले दायित्व सिद्ध करत असते. त्याचप्रमाणे याच कार्यक्रमात शाळेचे माजी विद्यार्थी आणि शिव मल्हार दूध संकलन केंद्र वाकडीचे संस्थापक विनोद लहारे यांनी शाळेसाठी 21000 रुपयाची देणगी दिली, त्याचप्रमाणे साई वेदांत पशुखाद्य रामपूरवाडी चे सर्वेसर्वा गणेश आग्रे यांनी शाळेला पाच हजार रुपयाची देणगी देऊन कृतज्ञता व्यक्त केली.
सदर प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांचे सुंदर असे कार्यक्रम पाहून दत्तगुरू पतसंस्थेचे संस्थापक सोपान काका कासार यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना एक हजार रुपये खाऊ साठी दिले. शिवजयंतीचा कार्यक्रम उत्कृष्ट आणि देखणा व्हावा, त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थिती नसल्याने मिशन आपुलकी अंतर्गत जास्तीत जास्त मदत कशी मिळवून देता येईल यासाठी गणेश कारखान्याचे संचालक अनिल काका गाढवे पाटील हे नेहमीच सहकार्य करत असतात, त्यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम अतिशय यशस्वी झाला . शाळेतील विविध उपक्रम आणि गुणवत्ता तसेच शाळेच्या विविध अडीअडचणी याबाबत सविस्तर विवेचन शाळेचे मुख्याध्यापक संजय घोलप सर यांनी केले.सदर कार्यक्रमाच्याप्रसंगी हिंदुस्तान फीडसचे सेल्स मॅनेजर पांडुरंग सातपुते, स्टोअर मॅनेजर रामदास कातोरे, स्टोर ऑफिसर स्वानंद जाधव, ग्राहक सेवा विकासअधिकारी किरण गायकवाड ,राहता तालुका अधिकारी शुभम लांडगे उपस्थित होते. गणेशनगर येथील सामाजिक कार्यकर्ते विजयराव सदाफळ आणि एसटी महामंडळाचे आदर्श कर्मचारी राजेंद्र जाधव यांनी शाळेसाठी साऊंड सिस्टिम भेट दिली .सदर प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे संचालक अनिल काका गाढवे तसेच सरपंच सुनीताताई कासार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रोहिणी घोगळ, दत्तगुरु पतसंस्थेचे सोपानका कासार ,माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य चौधरी सर, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, जयंत गिरमे ,निकिता परदेशी, अंबिका देसाई ,श्रद्धा राहिंज ,भारती मोहन ,कविता पवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता गायकवाड तर प्रास्ताविक कैलास चिंधे यांनी केले.
तसेच आभार प्रदर्शन रोशन धनवटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनिता गागरे, मनीषा निर्मळ, वेरोनिका गायकवाड, सुनील गायकवाड ,सोनल भावसार, भाऊसाहेब सहाणे यांनी विशेष परिश्रम घेतले. गणेशनगर शाळेला नेहमीच उच्चांकी मिशन आपुलकी मिळत असते, त्याबद्दल गट विकास अधिकारी विवेक गुंड,गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे, विस्ताराधिकारी भाऊसाहेब घोरपडे, विष्णू कांबळे, केंद्रप्रमुख सोमनाथ वैद्य यांनी अभिनंदन केले.
0 Comments