टाकळीभान प्रतिनिधी -अहील्यानगरच्या कबड्डीपटुंनी राज्यभरासह देशपातळीवर निर्माण केलेला दबदबा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचणार आहे.जपान येथे होणार्या २० व्या आशियाई क्रिडा स्पर्धा २०२६ साठी भारतीय पुरुष कबड्डी संघाची घोषणा करण्यात आली.कबड्डीची पंढरी समजल्या जाणार्या टाकळीभान(ता.श्रीरामपुर)येथील अस्लम इनामदार याची आशियाई स्पर्धेसाठी निवड झाल्याने अहील्यानगर जिल्ह्यासाठी हा सुवर्णमय क्षण असुन जिल्ह्याची मान उंचावली आहे.
गतविजेता म्हणुन स्पर्धेत उतरणार्या भारतीय संघात १२ खेळाडुंचा समावेश करण्यात आला आहे.यामधे अस्लमसह आशु मलिक,अयान लोहचब,देवांक दलाल,अर्जुन देशवाल,सुनील कुमार,जयदीप दहिया,राहुल सेथपाल,गौरव खत्री,सुमित सांगवान,अंकित जगलान,पवन सेहरावत या खेळाडुंची निवड झाली आहे.महाराष्ट्रातुन निवड होणारा अस्लम हा एकमेव खेळाडु असुन आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मधेही अस्लमने भारतीय कबड्डी संघाचे प्रतिनिधीत्व केले होते.
अस्लमने खेलो इंडिया स्पर्धा,राज्य अजिंक्यपद स्पर्धा,राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा,प्रो कबड्डी स्पर्धा या स्पर्धेमधे सातत्याने यश संपादन केले आहे.महाराष्ट्र शासनाच्या मानाच्या शिवछत्रपती पुरस्काराने अस्लमला सन्मानित करण्यात आले आहे.त्याच्या या निवडीने जिल्हाभरातुन त्याचे अभिनंदन होत असुन स्पर्धेतील कामगिरीसाठी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
शिवम,आदित्य व अजित यांना पुढील स्पर्धेची प्रतीक्षा
भारतीय संघाची जर्सी परीधान करण्याचे स्वप्न फार कमी खेळांडुंचे साकार होते.गेल्या वर्षभरापासुन भारतीय संघात निवडीसाठी राष्ट्रीय सराव शिबीरामधे मेहनत घेणारे अहील्यानगरचे कबड्डीपटु शिवम पटारे,आदित्य शिंदे व अजित पवार यांची भारतीय संघात निवड न झाल्याने तिघांनाही पुढील स्पर्धेपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.
0 Comments