सोयगाव दि.१८-- सोयगाव-जरंडी रस्त्यावरील शहरापासून जवळ असलेल्या विद्युत केंद्राजवळ दि.१८ मंगळवारी सकाळी दहा साडे दहा वाजेच्या सुमारास दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एक महिला जखमी झाली.जखमी महिलेला जरंडी गावचे माजी सरपंच समाधान तायडे यांनी तात्काळ सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव- जरंडी रस्त्यावरील शहरापासून जवळ असलेल्या विद्युत केंद्राजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात निंबायती येथील महिला वैशाली झाल्टे वय ३० वर्षे या जखमी झाल्या.जरंडी गावचे माजी सरपंच समाधान तायडे यांनी जखमी महिलेला उपचारासाठी तत्काळ ग्रामीण रुग्णालय सोयगाव येथे दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत पाटील,परिचारिका ज्योती आचार्य यांनी जखमी महिलेवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय जळगाव येथे पाठवण्यात आले. दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्त्यावर चिखल झाला आहे.यामुळे दुचाकी,चारचाकी वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.चिखलामुळे अपघात होत आहे.ठेकेदाराने एका बाजूचा रस्ता तरी सुरळीत करावा अशी मागणी जनतेतून केली जात आहे.
0 Comments