श्रीरामपूर (प्रतिनिधी)
नेहमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना किमान दिड लाख रुपये द्यावे असी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. पत्रकात शेळके यांनी म्हटले आहे की राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती सहकारी सोसायट्या बॅका यांच्या मार्फत घेतली आहे शिवाय पुढील काही दिवसांत सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु अद्यापपर्यंत नेहमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती बोलवली नसल्याने राज्यातील अनेक शेतकरी नाराज झाले आहेत गेली तीन वर्षांपासून कुठल्याही शेतमालाला भाव नाही शिवाय अतीवृष्टीने पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे .अनेक शेतकऱ्यांनी इकडून तिकडून शहरातील पाहुणे यांच्या कडून उसनवार करून पैसे भरले सरकारने शेतमाल कांदा सोयाबीन कापूस याची निर्यात बंद केल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे .आज अनेक लोक घेतलेल्या पैशांची मागणी करत आहेत तरी सरकारने त्यांची किमान दिड लाख रुपयांची अनुदान द्यावे अन्यथा राज्यात मोठा उद्रेक होईल असे शेळके यांनी म्हटले आहे.
0 Comments