विज्ञान जीवनाला दिशा देते - प्रमोद तोरणे

 


भिंगार :मानवी जीवनात विज्ञानाने मोठा बदल केला असून मानवी जीवन सुकर केले आहे परंतु ज्या संशोधका नी आपले जीवन व्यतित केले आहे त्यांचे स्मरण केले पाहिजे सर्व भारतीयांनी विज्ञानाची कास धरली पाहिजे माणसाचे जीवन विज्ञानमुळे बदले आहे असे प्रतिपादन विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद तोरणे यांनी केले.


रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती ॲबट शैक्षणिक संकुल, भिंगार येथे आज दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी 'राष्ट्रीय विज्ञान दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम भारतीय शास्त्रज्ञ सर सी. व्ही. रामन यांच्या सन्मानार्थ त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर उत्तर विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे मुख्याध्यापक नारायण अनभुले, पर्यवेक्षिका कविता शिंदे  प्राध्यापक पठाण सर ,विद्यार्थी पालक सौ वाघमारे ,उपशिक्षक देवकर सर यांच्या हस्ते विज्ञान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषाचे स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित गीत सादर केले त्याचबरोबर नाटिका ही सादर केली. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.विज्ञान दिनाचे महत्त्व आणि विज्ञानातील आधुनिक प्रगती यावर श्री. गणपत करवते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी विज्ञानामुळे मानवी जीवन कसे सुसह्य झाले आहे, हे उदाहरणांसह पटवून दिले.
विज्ञानातील क्लिष्ट संकल्पना सोप्या पद्धतीने समजून सांगण्यासाठी श्रीमती वैशाली दांदळे यांनी विविध प्रयोग आणि प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थ्यांनी या प्रयोगांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रदीप पाडळे यांनी अत्यंत ओघवत्या भाषेत केले.
​​कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती क्रांती घायतडक यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा आणि संशोधक वृत्ती वाढीस लागण्यास मदत झाली. 
​ 
​  या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले

Post a Comment

0 Comments