दिलीप शिंदे
सोयगाव दि.२८-- टिटवी कालिका गड या जंगलात फटाका फोडण्याचा व्हिडिओ बनवून फेसबूकवर व्हायरल केला होता.या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अजिंठा वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांच्या पथकाने दि.२८ शनिवारी टिटवी कालिका गड येथे फटाका फोडल्या ठिकाणचा पंचनामा केला असून व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल करणाऱ्या शाम चितळे ला घरी जाऊन नोटीस बजावली असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, अजिंठा वनपरिक्षेत्रा अंतर्गत असलेल्या टिटवी कालिका गड येथील जंगलात शाम चितळे नामक व्यक्तीने फटाका फोडतांचा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल केला होता. याप्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी जैवविविधता संवर्धनाचे राज्यभर कार्य करणारे डॉ.संतोष पाटील यांनी उप वनसंरक्षक सुवर्णा माने यांच्याकडे केली होती. अजिंठा वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांच्यासह पथकाने टिटवी कालिका गड या जंगलात जाऊन घटनास्थळाचा पंचनामा करून व्हिडिओ व्हायरल करणारे शाम चितळे यांच्या बुलढाणा येथील घरी जाऊन नोटीस देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान अजिंठा वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यावर राजकीय व वनविभागाच्या अंतर्गत दबाव येऊन कारवाई होईल किंवा नाही हे निरुत्तरित आहे.
प्रतिक्रिया :- जंगलात फटाका फोडणे ही अती संवेदनशील घटना असून या प्रकरणी वनविभागाने कुणाच्या दबावाला बळी न पडता तातडीने योग्य ती चौकशी करून सोमवार पर्यंत गुन्हा दाखल करून कारवाई न केल्यास सहाय्यक वन संरक्षक उप विभाग कार्यालय सिल्लोड येथे मंगळवार पासून आमरण उपोषण बसणार आहे.
डॉ.संतोष पाटील
अभिनव प्रतिष्ठान सिल्लोड
प्रतिक्रिया:- २) टिटवी कालिका गड जंगलात फटाका फोडल्याचा व्हायरल व्हिडीओ प्रकरणी गुन्हा नोंद करणे चालू आहे, गुन्हा नोंदविण्यात आला की माहिती देण्यात येईल.
संतोष दोडके
वन परिक्षेत्र अधिकारी अजिंठा
0 Comments