एसटी चालक सर्जेराव दत्तात्रय देठे यांचा सेवापुर्ती सोहळा उत्साहात संपन्न(विशेष उल्लेखनीय बाब=विना अपघात 29 वर्षाची अभिमानास्पद सेवा)



[✓^^पुढील काळात सर्जेराव दत्तात्रय देठे यांच्या हातून समाज सेवा घडो अशी मनोकामना पोलीस क्राईम न्यूज ब्युरो चीफ चे प्रतिनिधी व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जेष्ठ पत्रकार प्राध्यापक ज्ञानेश्वर बनसोडे यांनी व्यक्त केली^^]

(अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी)
. प्रा ज्ञानेश्वर बनसोडे सर 
  राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील रहिवासी असलेले व सामाजिक कार्याचा वसा घेतलेले व ^^जे का रंजले गांजले' तयांशी म्हणे जो आपूले तोची साधू ओळखावा..
 देव तेथेच जाणावा^^या उक्तीप्रमाणे सदा आचरण करीत असलेले व परिसरात एक कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले श्री सर्जेराव दत्तात्रय देठे हे महाराष्ट्र स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉरपोरेशन च्या कोपरगाव आगारातून एसटी चालक म्हणून आपल्या 29 वर्षाच्या प्रदीर्घ अशा सेवेतून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. एसटी चालक श्री सर्जेराव दत्तात्रय देठे यांनी आपल्या कार्यकाळात विना अपघात 29 वर्षाची अभिमानास्पद सेवा पार पाडली आहे. ही सर्जेराव देठे यांच्या बाबतीत विशेष उल्लेखनीय बाब असून सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात सुरक्षित; जबाबदार व प्रवासी हीत जपणाऱ्या चालक म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.^


^ कुणी निंदा अथवा वंदा; सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे हाच आमचा धंदा^^या उक्तीप्रमाणे त्यांनी आपले सेवाकाळात वेळेचे काटेकोरपणे पालन; शिस्तबद्ध वाहन चालकत्व; आणि प्रवाशांशी नम्रवर्तन याचा आदर्श ठेवला. त्यांच्या कार्यकाळात अनेक कठीण परिस्थितीचा सामना करताना त्यांनी सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले आणि अपघात मुक्त सेवेमुळे महामंडळाची प्रतिष्ठा उंचावली. सामाजिक कार्याची आवड जपत त्यांनी समाजातील विविध उपक्रमांमध्ये सहभाग नोंदविला आहे. त्यांच्या या सेवा काळातील 29 वर्षे विना अपघात सेवा व इतर काही चांगुलपणा या सर्व बाबींची दखल एस टी महांडळाणे एका खास कार्यक्रमाचं आयोजन करुन त्यांच्या या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी कोपरगाव आगारातील आगारातील अधिकाऱ्यांच्या हस्ते व उपस्थितीत नुकतेच शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन भव्य दिव्य असे गौरविण्यात आले आहे. याप्रसंगी कोपरगाव आगारातील बहुसंख्य कर्मचारी; नातेवाईक .मित्रमंडळी या सर्वांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सत्कार मूर्ती श्री सर्जेराव दत्तात्रय देठे यांनी आपले सेवा काळात सामाजिक कार्याची आवड जपत समाजातील विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंद विलाआहे .त्यांचे कुटुंब सुसंस्कृत व धार्मिका आचरण करणारे असून राहुरी कृषी विद्यापीठाचे शासकीय कर्मचारी श्री प्रवीण बाळासाहेब देठे यांचे ते चुलते असून पोलीस क्राईम न्यूज ब्यूरो चीफ अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जेष्ठ पत्रकार प्राध्यापक ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे यांचे व्याही आहेत..
प्रा. ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे यांनी आपल्या मनोगतात सत्कारमूर्ती सर्जेराव दत्तात्रय देठे यांना शुभेच्छा दिल्या व पुढील काळात त्यांच्या हातून निश्चितच समाजाची सेवा घडल्याशिवाय राहणार नाही असे ही मत व्यक्त केले. प्राध्यापक ज्ञानेश्वर बनसोडे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की; सर्जेराव देठे यांनी आपल्या कार्यकाळात विना अपघात 29 वर्षाची अभिमानास्पद सेवा करून एसटी महामंडळाला ते भूषणा वहअसे व्यक्तिमत्व ठरले आहे. सर्जेराव देठे हे एस टी महामंडळातून सेवानिवृत्त झाल्यामुळे एसटी महामंडळाला निश्चितच भविष्यकाळात त्यांची उणीव भासल्या शिवाय राहणार नाही .त्यांच्या या चांगुलपणाचा आदर्श एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी घेतल्यास निश्चितच एसटी महामंडळाची अधिकाधिक प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही.असे आपले प्रामाणिक मत प्राध्यापक बनसोडे यांनी व्यक्त केले.
सदरच्या या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमास कोपरगाव आगाराचे प्रमुख श्री अमोल बनकर हे अध्यक्षस्थानी होते. त्यांनी देखील सर्जेराव देठे यांना भविष्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. कु. तन्वी प्रवीण देठे या छोट्याशा चीमुरडीने देखील भाऊक होऊन आपल्या आजोबांना बुके देऊन त्यांचा सत्कार केला.
.कोपरगाव आगारात या आयोजित सेवापुर्ती कार्यक्रमास. परिसरातील नागरिक व आगारातील बहुसंख्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी आगारातील कर्मचाऱ्यांनी देखील या सत्कार पूर्ती सोहळ्याप्रसंगी सर्जेराव देठे यांना शुभेच्छा दिल्या. सदरच्या या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमास. विशेष उपस्थिती म्हणून पोलीस क्राईम न्यूज चीफ ब्युरो प्रतिनिधी प्रतिनिधी व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जेष्ठ पत्रकार प्राध्यापक ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे यांचे सह श्री बाळासाहेब दत्तात्रय देठे. तेजस दत्तात्रय देठे. सामाजिक कार्यकर्त्या सौभाग्यवती सुरेखा सर्जेराव देठे. महिला कार्यकर्त्या सौ सुशीला ज्ञानेश्वर बनसोडे. कुमारी तनवी प्रवीण देठे. सौ प्रमिला बाळासाहेब देठे. राज देठे. अनुज दादा बनसोडे;सौ विशाखा देठे.कु.मनस्वी जाधव.डॉ. साक्षी ज्ञानेश्र्वर बनसोडे. क्रांती प्रवीण देठे यांचे यांचे सह परिसरातील स्थानिक नागरिक! सगे सोयरे ;मित्र मंडळ व आप्तेष्टांनी सर्जेराव देठे यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने शाल श्रीफळ बुके व विविध प्रकारची भेट वस्तू देऊन भव्य असा सत्कार करून त्यांच्या पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. सत्कार मूर्ती सर्जेराव देठे आपले मनोगत व्यक्त करताना अति भावुक झाले होते. परंतु त्यांनी आपल्या भावनांना आवर घालून आपले मनोगत व्यक्त केले. सदरच्या या सेवापूर्तीच्या कार्यक्रम प्रसंगी अल्पोप हाराचे देखील नियोजन करण्यात आले होते. सर्जेराव देठे यांचा सेवानिवृत्त चा कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य अशा मोठ्या थाटामाटात विविध मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत त्यांचा सत्कार सन्मान सोहळा प्रसन्न अशा वातावरणात व मोठ्या आनंदात पार पाडला गेला.

Post a Comment

0 Comments