भारतीय लहुजी सेनेचे सेनाप्रमुख माननीय वी.जी.रेड्डी साहेब यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

भारतीय लहुजी सेनेचे सेनामुख्य मा. वी. जी. रेड्डी साहेब यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन 


टाकळी बु. | प्रतिनिधी
भारतीय लहुजी सेनेचे सेनामुख्य मा. वी. जी. रेड्डी साहेब यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त तसेच भव्य स्मारक उद्घाटन सोहळ्याचे आयोजन रविवार, दिनांक ९ मार्च २०२५ रोजी टाकळी बु. (ता. नगर) येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमानिमित्त विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन व मार्गदर्शनपर कार्यक्रम पार पडणार आहे.

समाजातील वंचित व शोषित घटकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर कार्य करणारे मा. वी. जी. रेड्डी साहेब यांच्या कार्याचा गौरव व स्मरण या निमित्ताने करण्यात येणार आहे. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या भव्य समारंभासाठी श्रीरामपूर तालुक्यातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.
सदर कार्यक्रमास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल व राष्ट्रीय सचिव हनीफ भाई पठाण यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments