राजकुमार गडकरी
शिर्डी ( प्रतिनिधी)-दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राहाता तालुक्यातील सावळीविहीर खुर्द येथील गावामध्ये असणाऱ्या लक्ष्मी आई चा यात्रा महोत्सव होळीच्या दिवशी म्हणजे सोमवार दोन मार्च 2026 रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.ही देवी भक्ताच्या नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असून या ठिकाणी मंदीर लगत विद्युत रोषणाई केली जाते.
तसेच या ठिकाणी सावळी विहीर सह पंचक्रोशीतील भाविक भक्त देवीच्या दर्शनासाठी येतात. नवस करतात, नवस फेडतात. सावळीविहीर खुर्द ग्रामदैवत असलेल्या सर्व ग्रामस्थ देवीच्या यात्रेत सहभागी होतात. लक्ष्मी आई यात्रा महोत्सव हा होळीच्या दिवशी सोमवार दिनांक 2-3-2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे. यात्रेच्या दिवशी सकाळी लक्ष्मी मातेला अभिषेक करण्यात येणार आहे. होम हवन ,सायंकाळी काठी मिरवणूक, शोभेची दारू ,व देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम सादरीकरण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गाण्यांची जुगलबंदी होणार आहे . छत्रपती संभाजी नगर येथील संतोष शिंदे , भाऊसाहेब शिंदे यांचा जागरण गोंधळ गीते तसेच शिर्डी येथील किरण बत्तीशे या देवीचे गीतगायक आदी नामांकित सुप्रसिद्ध गायक येथे कार्यक्रमानिमित्त हजेरी लावणार आहेत. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने या सर्व कार्यक्रमाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन यात्रा कमिटी , तसेच सावळीविहीर खुर्द ग्रामस्थ यांनी केले आहे.
0 Comments