हनुमंतगाव ( प्रतिनिधी)
ज्ञानदीप वाचनालय, हनुमंतगाव व एकलव्य भिल्ल सेना, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांच्या पुढाकारातून हनुमंतगावात पत्रकार दिन अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. पत्रकारितेच्या कार्याचा गौरव करत गावपातळीवर पत्रकारांचा सन्मान करण्याचा उपक्रम राबविल्यामुळे हा सोहळा हनुमंतगावच्या इतिहासात अभिमानाने नोंदवला जाईल, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाची सुरुवात पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन, सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. वातावरणात स्नेह, आदर आणि कृतज्ञतेची भावना दाटून आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घोलप सर यांनी समर्थपणे करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. अध्यक्षस्थानी ॲड. किसनराव शंकरराव कोतकर हे विराजमान होते.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार तसेच स्थानिक ग्रामस्थ कै. सोपान धोंडिबा पर्वत, कै. अशोक विश्वनाथ घोलप, कै. गडधे महाराज, कै. नानासाहेब ब्राम्हणे व भागीरथीबाई ब्राम्हणे या दिवंगत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या सामाजिक कार्याची व गावाशी असलेल्या नात्याची आठवण काढत उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी बोलताना ज्ञानेश्वर अहिरे म्हणाले, “पत्रकार हे समाजाचे सजग प्रहरी आहेत. गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश आणि जगात घडणाऱ्या घटना कोणताही संकोच न बाळगता समाजासमोर मांडण्याचे धाडस पत्रकार करतात. सत्य मांडण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करणे म्हणजे समाजाच्या कृतज्ञतेचा प्रत्यय होय.” त्यांच्या या विचारांना उपस्थितांकडून दाद मिळाली.
पत्रकार आणि समाज यांच्यातील नाते अधिक दृढ व्हावे, पत्रकारितेतील सत्यनिष्ठा, निडरपणा आणि समाजाभिमुखता यांचा गौरव व्हावा, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गावपातळीवर पत्रकारांचा सन्मान करण्याची परंपरा सुरू करण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे अनेकांनी नमूद केले.
कार्यक्रमास हनुमंतगाव येथील. प.डॉ. वि. वि. पा. स. साखर कारखाना संचालक अशोक पा. घोलप, अॅड.विलासराव ब्राम्हणे, वंसत घोलप,प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव गांगुर्डे,अनिल घोलप,संजय अनाप सर, बाळासाहेब दिघे, उत्तम जेजुरकर,बाबासाहेब अंत्रे, भानुदास पर्वत, दिपक घोलप,नामदेव अनाप, अण्णासाहेब गावडे, भागवत अनाप, सूर्यभान घोलप, गोरक्ष ब्राम्हणे, अशोकराव ब्राम्हणे, शब्बीरभाई शेख, सुकदेव पवार,विकास अनाप,शिवाजी गावडे,अनिल डिबंर,सचिन बुचुडे,रविंद्र पर्वत,सचिन पवार,सुजित पर्वत,त्रुषीकेश अहिरे,दत्तात्रय प्रधान,ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक, ज्ञानदीप वाचनालयाचे सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments