अलका आहेर यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न



 लोहगाव (वार्ताहार): प्रवरानगर येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य अलका आहेर यांचा सेवापूर्ती व कृतज्ञता समारंभ नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे, उपाध्यक्ष अरुण कडू, एकनाथराव घोगरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रावसाहेब म्हस्के हे उपस्थित होते.

 सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायन केले. यावेळी सत्कारमूर्ती अलका आहेर व संपत तांबे या उभयतांचा प्रमुख पाहुणे डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते तसेच रयत बँकेच्या वतीने व्हाईस चेअरमन दिलीप डहाळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मानपत्राचे वाचन डॉ. शरद दुधाट यांनी केले. यावेळी रूपाली तांबे, डॉ. श्रद्धा तांबे, प्रितेश तांबे, संपत तांबे, हर्षली आहेर, देवेश आहेर, संजय ठाकरे, माजी प्राचार्य अंगद काकडे, माजी प्राचार्य अण्णासाहेब साबळे, प्रभावती घोगरे, प्रमोद तोरणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे डॉ. सुधीर तांबे यांनी आपल्या मनोगतातून अलका आहेर यांना शुभेच्छा दिल्या. तर अध्यक्षीय भाषणातून रावसाहेब म्हस्के यांनी अलका आहेर यांचे सेवाकार्याबद्दल कौतुक केले. यावेळी सुधीर म्हस्के, मुख्याध्यापिका विद्या ब्राह्मणे, उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, पर्यवेक्षिका संगीता सांगळे, पर्यवेक्षिका साबळे मॅडम, माजी उपप्राचार्य अलका आहेर, माजी प्राचार्य मधुकर अनाप, गोरक्षनाथ बनकर, भाऊसाहेब पेटकर, माजी मुख्याध्यापक दिलीप नाईक, समशेर पठाण, रामभाऊ गमे, संजय डुबे, बाबासाहेब अंत्रे, विलास गभाले यांच्यासह नातेवाईक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शरद दुधाट, रेणुका वर्पे व प्रतिभा ठोकळ यांनी केले तर शेवटी मुख्याध्यापिका नलिनी जाधव यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments