पेंशनर संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनास श्रीरामपूर तालुक्यातील पदाधिकारी हिंगोली कडे रवाना .

दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी -पेंशनर संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशाचे हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथे ३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अधिवेशना साठी श्रीरामपूर तालुक्यातील पदाधिकारी रवाना झाले .
अधिवेशना साठी श्रीरामपूर तालुक्यातून अहिल्यानगर जिल्हा पेंशनर संघटनेचे उत्तर जिल्हा प्रमुख अशोकराव बागुल . जिल्हा कार्याध्यक्ष रावसाहेब पवार . श्रीरामपूर तालुका अध्यक्ष शिवाजी गोसावी . कार्याध्यक्ष दिलीप फुलवर . सचिव उत्तमराव शेलार . उपाध्यक्ष सुरेश तडके . प्रसिद्धी प्रमुख सूर्यभान वडितके . नगर पालिका अध्यक्ष प्रकाश माने . संपर्क प्रमुख शिवनाथ नारायणे आदी पदाधिकारी रवाना झाले .
  या अधिवेशनात सेवा निवृत्तांचे वेतन ट्रेझरी मार्फत दरमहा एक तारखेला व्हावे - . सेवा निवृतांना सर्व आर्थिक लाभ सेवा निवृती नंतर तातडीने मिळावे . पेंशनरांना आरोग्य केंद्राप्रमाणे मिळावा . यासह अनेक मागण्या करण्यात येणार आहेत . या अधिवेशनात राज्यस्तरीय जीवन गौरव सेवा निवृत्त पुरस्कार वितरणाचे आयोजन केले आहे . या अधिवेशनासाठी श्रीरामपूर तालुक्यातील सर्व सेवा निवृत्त शिक्षकांना रवाना झाले आहे,

Post a Comment

0 Comments