संगमनेर तालुक्यातील वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेल्या (पी. आर.ओ) ची महत्वपूर्ण बैठक संपन्न....l

संगमनेर तालुका प्रतिनिधी 

संगमनेर तालुक्यातील वैद्यकीय सेवेत कार्यरत (पी.आर.ओ) बांधवांची महत्वपूर्ण बैठक शहरातील कृष्णा गार्डन येथे संपन्न झाली. विविध हॉस्पिटल मध्ये सेवा देणारे बांधव अतिशय खडतर परिस्थितीमधे हॉस्पिटलला सेवा देण्याचे काम करतात आपल्या सेवाकार्यकाळात अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते भविष्याच्या दृष्टीने कौटोंबिक व स्वतःसाठीच्या संरक्षणाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची उपाययोजना उपलब्ध करून दिली जात नाही योग्य उपाययोजना उपलब्ध व्हावी म्हणून आजच्या बैठकीमध्ये उपस्थित बांधवांनी येणाऱ्या अडचणी आपल्या मनोगताद्वारे व्यक्त करून ठोस उपाययोजना करण्याच्यादृष्टीने आजच्या बैठकीत आपल्या ऐक्याचे दर्शन घडविले.
   या बैठकीमध्ये अहिल्यांनगर जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष विल्सन वंजारे,उपाध्यक्ष रामदास शेवाळे,सचिव राकेश जोंधळे,खजिनदार रवींद्र सोनवणे आदी मान्यवरांनी उपस्थितांना एकजूट झाल्यावर सामुहिकरीत्या आपल्या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्यास चांगले संघटन उभे राहील तसेच त्यांच्या कामाचाही अनुभव सांगून सदैव सहकार्याची भावना व्यक्त केली.
  बैठकीस, वरिष्ठ पी. आर. ओ उद्धव खर्डे,बाळासाहेब गाढवे,बाळासाहेब राऊत,अनिल भोसले,संदीप शिंदे,नितीन कुलधरण,रवींद्र सोनवणे,मधुकर पवार,गणेश सोनवणे,योगेश कुटे,दीपक गुंजाळ,विक्रम सुर्वे,नानासाहेब कालेकर,लक्ष्मण varpe, सुमित शेळके, सुयोग नाईक, राकेश जोंधळे, दिलीप जाधव,मुकेश बोरुडे आदींची उपस्थिती होती.
   बैठक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळात काहीतरी चांगलं घडेल याबाबतचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता.अनिल भोसले यांनी बैठकीचे सूत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments