टाकळीभान प्रतिनिधी - समाज्यातील वैशिष्ट्यपूर्ण घटनांचे वार्तांकन, संशोधन, तसेच समाज जागृती बरोबर लोकशाहीचा चौथास्तंभमजबुत ठेवण्याचे महत्वपुर्ण काम पत्रकार बंधू करत असल्यानेच आपली लोकशाही मजबूत आहे. पत्रकारीता हे फार मोठे जबाबदारीचे काम आहे, हे काम करत असताना ग्रामीण भागातील पत्रकारांचे ही मोठे योगदान आहे असे प्रतिपादन युवा कार्यकर्ते व अशोकचे संचालक निरज मुरकुटे यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे स्व. ऋषी छल्लारे फाउंडेशन च्यावतीने नुकताच पंचक्रोषीतील पत्रकारांसाठी पत्रकारांचे आयोजन करण्यात आले. या पत्रकार दिनाचे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अशोकचे मा. व्हा. चेअरमन व विद्यमान संचालक पुंजाहरी शिंदे होते तर प्रमुख आतिथी म्हणून संचालक निरज मुरकुटे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मयुर पटारे, सोसायटीचे चेअरमन कारभारी तागड, संपादक व पत्रकार संघटनेचे चंद्रकांत लांडगे, भोकरचे ग्रामविकास अधिकारी गणेश दुधाळे आदि व्यासपिठावर उपस्थीत होते.
पुढे बोलतांना निरज मुरकुटे म्हणाले की जिल्ह्यामध्ये पत्रकारांचे उत्कृष्ट काम असुन पत्रकारांच्या निर्भीड लिखानामुळे सर्वसामान्यांना न्याय मिळत आहे व युवा पिढी घडविण्यासाठी महत्वाचे योगदान असुन यापुढेही पत्रकारांच्या सहकार्यामुळे इतरही प्रश्न सुटणार असल्याचे मुरकुटे यांनी यावेळी सांगीतले. सालाबादप्रमाणे यावर्षीही भोकर येथे असंघटीत बांधकाम कामगार नेते गणेश छल्लारे यांचेवतीने स्व, ऋषी छल्ला रे फाउंडेशनने पत्रकार दिनानिमीत्ताने भोकर, टाकळीभान, खोकर, माळवाडगांव व वडाळा महादेव येथील पत्रकारांना भेटवस्तू व पेन प्रदान करून सन्मान, गौरव करण्यात आला.
पत्रकारांमुळे समाज कार्य करत असताना केलेल्या कार्याची बातमी वर्तमानपत्रात प्रकाशीत झाल्यानंतर केलेल्या कामाच्या समाधानाबरोबरच नवीन काम करण्यास प्रोत्साहन मिळत असते. समाज कार्याला आरंभ करताना सर्वच पत्रकारांनी त्या कार्याला समाजापर्यंत पोहचविल्यानेच समाज कार्याची आवड निर्माण झाली. गावातील छोट्याछोट्या कामापासून सुरूवात केली त्यातूनच गावातील विविध संस्थांवर पदभुषविता आले. याच कार्यातून बाधकाम कामगारांसाठीच्या योजना राबविता आल्या. समाजापासून वंचीत व दुर्लक्षीत घटकाला न्याय देता आला. या कामगारांना कोट्यावधी रूपये कामगारांनापर्यंत पोहचविता आले. याच माध्यातून आता बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवून देत आहोत. त्याच बरोबर लाडकी बहीण योजनेतून हजारो महिलांना मोफत अर्जसुविधा उपलब्ध करून दिली, त्यानंतर याच लाडक्या बहीणींसाठीची ईकेवायसीची सुविधा ही मोफत उपलब्ध करून दिल्याचे स्व. ऋषी छल्ला रे फाऊंडेशनचे संस्थापक गणेश छल्लारे यांनी प्रास्ताविकात सांगीतले.
यावेळी सागर आहेर तसेच पत्रकार चंद्रकांत झुरंगे, बापुसाहेब नवले यांनी मनोगत व्यक्त करताना पत्रकारीतेतील विविध अनुभव विषद करत आजच्या समाज व्यावस्थेवर प्रकाश टाकला.
या कार्यक्रम प्रसंगी अशोकचे संचालक पुंजाहरी शिंदे, भागवतराव पटारे, सोसायटीचे व्हा. चेअरमन दत्तात्रय पटारे, उपसरपंच गीरीष मते, माजी उपसरपंच राजेंद्र चौधरी, सोसायटी माजी अध्यक्ष महेश पटारे, काँग्रेसचे अध्यक्ष रामदास शिंदे, आण्णासाहेब वाकडे, शाळा व्यावस्थापनचे अध्यक्ष ऋषिकेश झिने, रिपाईचे सागर अमोलीक, माजी उपसरपंच संदीप गांधले, भारत छल्लारे, दत्तात्रय पटारे, सागर आहेर गंगाराम गायकवाड, ज्ञानेश्वर काळे, नामदेव चव्हाण, राजेंद विधाटे, ठकसेन खंडागळे, संतोष भोगे, बांधकाम संघटनेचे प्रताप लोखंडे, आकाश आस्वले, रामदास ढोकणे, काळू गायकवाड, तानाजी राक्षेयांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आकाशवाणीचे निवेदक संतोष मते यांनी केल तर आभार सोसायटीचे माजी चेअरमन महेश पटारे यांनी मानले.
0 Comments