स्वराज्य पोलीस मित्र व पत्रकार संघटनेच्या राहाता तालुक्यात कार्याध्यक्षपदी : श्री. संपत डी. निर्मळ (आबा) यांची निवडीमुळे पिंपरी निर्मळ सामाजिक संघटने कडून अभिनंदन चा वर्षाव



 लोणी प्रतिनिधी/राहाता तालुक्यातील सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात सक्रिय असणारे श्री. संपत डी. निर्मळ (आबा) यांची स्वराज्य पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटना, राहाता तालुका कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या निवडीच्या निमित्ताने त्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. या वेळी कृषिधन कृषिसेवा चे मालक दिलीप निर्मळ, साई सोहम दूध संकलन केंद्र चे चेअरमन संजय निर्मळ तसेच प्रो. राजू निर्मळ सर, यांच्या हस्ते श्री. संपत डी. निर्मळ (आबा) यांचा फुल गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा करत पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

संघटनेच्या माध्यमातून पोलीस मित्र, पत्रकार व समाजहितासाठी प्रभावीपणे कार्य करण्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे कार्य अधिक बळकट होईल, असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.

श्री. संपत डी. निर्मळ (आबा) यांच्या या निवडीमुळे राहाता तालुक्यातील सामाजिक क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments