कंदुरीत वाद; बोकड कापण्यासाठी गेलेल्या शाहीदचा गोळ्या घालून खून...



   टाकळीभान प्रतिनिधी-कंदुरी साठी बोकड कापण्यास गेलेल्या ठीकाणी वाद होवून शाहीद शेख या तरुणाचा गावठी कट्यातून गोळ्या घालून खून करण्यात आला असून या घटनेने नेवासा तालुक्यात खळबळ उडाली आहे. एसपी सोमनाथ घार्गे व अप्पर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांचे मार्गदर्शना खाली खून करणारे आरोपी सुरज लतीफ शेख व अक्षय जाधव यांचा नेवासा सोनई पोलीस कसून शोध घेत आहेत.
   याबाबत अधिक माहिती समजलेले माहिती अशी की, काल रविवार दि 11 जानेवारी रोजी सोनई पोलीस स्टेशन हद्दीतील चांदा गाव शिवारात आरोपी सुरज लतीफ शेख, वय -23 वर्ष, रा.चांदा,ता.नेवासा याच्या शेतात कंदुरीचा/जेवणाचा कार्यक्रम असल्यामुळे यातील मयत इसम शाहिद राज महंमद शेख, वय-23 वर्ष, रा.चांदा, ता.नेवासा हा कार्यक्रम स्थळी बोकड कापण्यासाठी गेलेला होता. सदर ठिकाणी साधारण सायंकाळी ४.४५ ते ५ वाजन्याच्या सुमारास यातील मयत शाहिद शेख आणि आरोपी सुरज लतीफ शेख व अक्षय जाधव यांच्यात वाद झाल्यामुळे आरोपींनी अग्निशस्त्रातून फायर करून शाहिद राजमहंम्मद शेख याचा खून केला आहे. मृतदेह पोस्टमार्टम करणे कामे सिविल हॉस्पिटल अहिल्यानगर येथे पाठवण्यात आलेला असून आरोपींचा शोध घेणेकामी पथक रवाना करण्यात आले आहे. सोनई पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असून पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments