राहाता प्रतिनिधी : तालुक्यातील प्रवरानगर (लोणी) येथील विठ्ठलराव विखे पाटील तंत्रज्ञान व अभियांत्रिकी (पॉलिटेक्निक) कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेली कु. प्रिया संपत (आबा) निर्मळ हिने क्लाउड कॉम्प्युटिंग आणि बिग डेटा परीक्षा २०२५ मध्ये उत्कृष्ट गुणांसह द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे कॉलेजसह प्रवरानगर परिसरात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे.
कु. प्रियाने मिळवलेल्या या यशामुळे आपल्या वडिलांचे, कॉलेजचे व शिक्षकांचे नाव उज्ज्वल केले आहे. पुढील काळातही ती उच्च शिक्षणात व तंत्रज्ञान क्षेत्रात भरीव कामगिरी करेल, अशा अपेक्षा तिच्या स्नेही, नातेवाईक व शिक्षणप्रेमींनी व्यक्त केल्या आहेत.
या यशामागे कॉलेज प्रशासन व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य श्री. राठी सर, विभाग प्रमुख श्री. लावरे सर, वर्गशिक्षक सोनाली म्हस्के मॅडम तसेच विषय शिक्षक श्री. निलेश लांडगे सर, तेजल म्हसे मॅडम, श्री. कवडे सर, श्री. पठारे सर, सौं. गौरी कडू मॅडम, श्री. सागर त्रिभुवन सर व सौं. पल्लवी लगड मॅडम यांच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांचे भविष्य घडते, याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे बोलले जात आहे.
या उज्ज्वल यशाबद्दल राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेशचे अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष शहाजी दिघे साहेब व तालुका उपाध्यक्ष शंकर सोनवणे यांनी कु. प्रियाचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. तसेच स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण संघटनेचे कार्याध्यक्ष संपत निर्मळ (आबा), उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे व सरचिटणीस उमेश पन्हाळे (राहाता तालुका) यांच्या वतीनेही कु. प्रिया निर्मळ हिचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले आहे.
कु. प्रियाच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असून, शिक्षणाच्या जोरावर यशस्वी भवितव्य घडवता येते, याचा विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला आहे.
0 Comments