पत्रकार जागृत असल्याने प्रशासनावर त्यांचा वेगळाच दबाव राहिला आहे.. मयूर पटारे




टाकळीभान प्रतिनिधी -येथील पञकार नेहमीच जागृत आसल्याने प्रशासनावर त्यांचा वेगळाच दबाव राहीला आहे.त्यामुळे गावाच्या विकासाला दिशा मिळालेली आहे. माझ्या राजकिय जडणघडणीत पञकारांचा मोलाचा सहभाग आसल्याने मला घडवण्याचे काम पञकारांनीच केले असे प्रतिपादन श्रीरामपुर बाजार समितीचे संचालक मयुर पटारे यांनी पञकार दिना निमित्त आयोजित पञकार सन्मान सोहळ्यात बोलताना केले. 

      यावेळी कारेगाव भागचे संचालक शिवाजी शिंदे, प्रा. कार्लस साठे, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, आॕड. धनराज कोकणे प्रमुख उपस्थित होते.
         श्रीरामपुर बाजार समितीचे संचालक युवा नेते मयुर पटारे यांच्या वतीने गेल्या चार वर्षांपासुन पञकार दिनी परीसरातील पञकारांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. यावेळी टाकळीभान उपबाजार आवारात आयोजित कार्यक्रमात बोलताना पटारे म्हणाले कि, पञकारांनी नेहमीच माझ्या सामाजिक कामांची दखल घेतली आहे. त्यामुळे मला राजकारणातही संधी मिळाली. ग्रामपंचायत सदस्य व त्यानंतर थेट तालुक्यात बाजार समितीचा संचालक होवीन काम करण्याची संधी मिळाली. या प्रवासात पञकारांचा मोलाचा वाटा आहे. येथील पञकार सदैव जागृत आसल्याने प्रशासनावर अंकुश ठेवुन आसतात. त्यामुळे गावाच्या विकासाला पञकारांमुळेच दिशा मिळाली आसल्याचेही पटारे यावेळी म्हणाले.
          यावेळी राजेंद्र कोकणे, शिवाजी शिंदे, प्रा. कार्लस साठे, माजी सरपंच भाऊसाहेब मगर यांनीही पञकारांच्या उल्लेखनिय कामाचा गौरव करुन पञकारांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पञकारांच्या वतीने चंद्रकांत झुरंगे यांनी पञकारांच्या समस्यांची मांडणी करुन ग्रामस्थांनी पञकारांना सहकार्य करण्याचे अवाहन केले. यावेळी दादासाहेब कापसे, सामाजिक कार्यकर्ते बापुसाहेब शिंदे, भास्करराव कोकणे, नानासाहेब रणनवरे, रावसाहेब वाघुले, शिवाजी पटारे, बाबासाहेब लोखंडे, सुभाष ब्राम्हणे, शिवाजी पवार सुनील बोडखे सह टाकळीभान, भोकर, खोकर परीसरातील पञकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचलन अर्जुन राउत यांनी केले.

Post a Comment

0 Comments