नेवासा पोलीस स्टेशनवर हल्लाबोल मोर्चाचा इशारा देताच मुलीचे अपहरण करणाऱ्या लखन साळवे याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

नेवासा ( प्रतिनिधी)

भिल्ल समाजावर अन्याय करणाऱ्या एकालाही सोडणार नाही-ज्ञानेश्वर अहिरे
संपूर्ण जिल्ह्यात गाजलेल्या नेवासा तालुक्यातील सलबतपुर येथील आदिवासी मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुस्क्या आवळल्या असून अपहरण झालेली आदिवासी मुलगी पोलिसांनी आई-वडिलांच्या ताब्यात दिली आहे.

          नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील आदिवासी अल्पवयीन मुलीचे नेवासा फाटा आयटीआय कॉलेज पासून अपहरण झाले होते. जवळपास एक महिना झाला तरी मुलीचा शोध लागत नव्हता मुलीचे आपण करणारा आरोपी पोलिसांना हुलकावणी देत होता. त्यानंतर आदिवासी संघटना आक्रमक झाल्या व थेट नेवासा पोलीस ठाण्यासमोर मुलीचे आई-वडील व आदिवासी बचाव समितीचे पदाधिकारी बेमुदत आमरण उपोषणास बसले. त्यानंतर नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी उपोषणाचे नेतृत्व करत असलेले आदिवासी बचाव समितीचे संस्थापक सदस्य शिवाजीराव गांगुर्डे यांची भेट घेऊन पाच दिवसाचा कालावधी द्या मुलगी हजर करतो असे आश्वासन दिले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले . पाच दिवसात मुलीचा शोध लागला नाही तर नेवासा पोलीस स्टेशनवर आदिवासींचा हल्लाबोल मोर्चा काढण्यात येईल असा इशारा एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी नेवासा पोलिसांना दिला. आणि वेगाने तपासाची सूत्रे फिरली. पोलिसांनी एक पथक तयार करून मुलीच्या शोधासाठी लोकेशन च्या आधारे आरोपीचा पाठलाग सुरू केला. व बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुलीचा सुगावा लागताच. पोलिसांनी अपहरण झालेल्या मुलीला ताब्यात घेतले व आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यानंतर मुलीच्या आईच्या फिर्यादीनुसार आरोपी लखन तातूराम साळवे रा. मुकिंदपुर नेवासा फाटा याच्यावर गु र न १०१५/२०२५ बी एन एस १३७(२)६४(२)एम२४९ पोस्को ४,६,८,१२,२१ नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी लखन साळवे याला ९ तारखेपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.

 त्यानंतर एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे म्हटले आहे माझ्या भिल्ल समाजावर जो कोणी यापुढे अन्याय करेल त्या कोणाचीही बरीगत ठेवणार नाही व जशास तसे उत्तर यापुढेही असेच दिले जाईल.अल्पवयीन आदिवासी मुलीचा शोध लागल्यानंतर आक्रमक भूमिका घेणाऱ्या आदिवासी संघटनांनी नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचे आभार मानले आहेत. व लवकरच आदिवासी बचाव समितीच्या वतीने महेश पाटील यांचा सत्कार केला जाणार आहे.

Post a Comment

0 Comments