टाकळीभान ग्रामपंचायतीकडून सदस्यांना आंधारात ठेवुन स्वच्छतेचा "फार्स", प्रत्यक्षात स्वच्छता बोजवारा, सदस्यांचा घरचा आहेर.



दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी — श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान ग्रामपंचायतीने ग्रामस्वच्छता मोहीमेत भाग घेतल्याने पहाणी पथक आले आसता काही विद्यमान सदस्यांनी पथकाची भेट घेवुन स्वच्छतेचा फक्त फार्स केला जाता आसुन थातुरमातूर स्वच्छता सोडली तर प्रत्यक्षात घाणीचे साम्राज्य या गावामध्ये पसरले असल्याचा आरोप या विद्यमान सदस्यांनी केल्याने मुख्यमंत्री ग्रामस्वच्छता अभियानावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
            नूकतेच टाकळीभान येथे मुख्यमंत्री ग्राम समृध्दी स्वच्छता कमीटीने भेट दिली. यावेळी थातूरमातूर स्वच्छता वगळता परिपूर्ण स्वच्छता केली गेली नसल्याचे ग्रा.पं.सदस्य मयुर पटारे, सुनिल बोडखे, लता पटारे, सुनिल त्रिभूवन, कविता रणनवरे, अशोक कचे यांनी पथकाची भेट घेवुन केली आहे. याबाबत सदर सदस्यांनी सहीनिशी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे कि, सदरची स्वच्छता आम्हां सदस्यांना मान्य नाही. 

त्या कामाचे बील काढू नये. गावामध्ये कायमस्वरूपी कचरा गाडी बंद आहे. त्याचबरोबर प्राथमीक आरोग्य केंद्राच्या पाठीमागे घाणीचे साम्राज्य पसरले असून त्या ठिकाणी कुत्रे मरण पावलेले व कुजलेल्या आवस्थेत असल्याने दुर्गंधी येत आहे. गावात इतर ठिकाणीही स्वच्छतेबाबत अशीच काहीशी आवस्था असल्याचे सदस्यांनी म्हटले असून दिलेल्या प्रसिध्दी पत्रकावर वरील सहा सदस्यांच्या सह्या आहे.

Post a Comment

0 Comments