महात्मा गांधी संकुलात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा




लोहगाव (वार्ताहर): प्रवरानगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात ७७ वा प्रजासत्ताक दिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. 
यावेळी संकुलाचे प्राचार्य विनायक मेथवडे व उपप्राचार्य अलका आहेर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. छात्रसैनिक प्रमुख दीपक धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली छात्रसैनिकांनी उत्कृष्ट ध्वजसंचलन केले. याप्रसंगी कन्या विभाग व मुले विभागाच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्तीपर गीतांवर नृत्य आणि गायन केले. विद्यार्थ्यांची नरेंद्र ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त कवायत घेतली. तर संविधान व साक्षरतेची शपथ डॉ. शरद दुधाट यांनी दिली. याप्रसंगी मुख्याध्यापिका नलिनी जाधव, उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, पर्यवेक्षिका संगीता सांगळे, ज्येष्ठ शिक्षक संजय ठाकरे, संजय डुबे, बाबासाहेब अंत्रे, विलास गभाले, शिवप्रसाद जंगम यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका वर्पे, संगीता उगले, प्रतिभा ठोकळ यांनी केले.

Post a Comment

0 Comments