टाकळीभान ग्रामसभा विविध मुद्द्यावर गाजली



दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी : महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या अडकाठी धोरणामुळे  ग्रामपंचायतचा कारभार नीट पाहता आला नाही, पुन्हा ग्रामपंचायतची निवडणूक लढवणार असून आगामी होणाऱ्या निवडणुकीमध्ये सांगता सभेमध्ये यांचे सर्व पितळ उघडे पाडणार असून, मी देणाऱ्या पुराव्यामुळे संबंधित पुढाऱ्यांना त्यांना घरचे सुद्धा जवळ करणार नाही व जनता निवडणुकीच्या वेळी त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असे उद्गार उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ग्राम सभेप्रसंगी काढले.
          ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी गावच्या प्रथम नागरिक  सरपंच अर्चनाताई रणनवरे होत्या. 
यावेळी खंडागळे म्हणाले की सत्ता आल्यापासून गावच्या विकासासाठी व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केला असून जल जीवन मिशन योजना १८ कोटीच्या वाढीव प्रस्तावा  जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविला आहे. 
त्याचप्रमाणे घरकुल हा गावातील सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असून शासनाने आहे त्या ठिकाणी घरकुल बांधण्यास परवानगी दिल्यास टाकळीभान मध्ये शंभर ते सव्वाशे नवीन घरकुल होतील. ३ कोटी रुपयांचा निधी जिल्हा क्रीडांगणासाठी असून श्रीरामपूर तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा जिल्हा क्रीडांगणासाठी जागा उपलब्ध नसल्यास टाकळीभान येथे पर्याय म्हणून जिल्हा क्रीडांगण होऊ शकते त्यास ग्रामपंचायत च्या वतीने जागा उपलब्ध करून देऊन सहकार्य करणार असल्याचे कान्हा खंडागळे यांनी सांगितले.
     यावेळी संजय रणनवरे यांनी बस स्टॅन्डचा जागेचा उतारा असून आहे त्याच ठिकाणी बस स्टँड करण्याची मागणी केली. ॲड धनराज कोकणे यांनी प्रभाग क्रमांक ५ टाकळीभान घोगरगाव रोड कोकणे वस्तीपर्यंत पिण्याचे पाणी येत नसून, येथील विहीर व बोअरचे पाणी खराब असल्याने ग्रामपंचायतने  येथील नागरिकांसाठी पाण्याची व्यवस्था करावी.तसेच शासनाच्या योजना सर्वसामान्यांचे शेवटचा घटकापर्यंत पोहोचण्यासंदर्भात मागणी केली. अर्जुन राऊत यांनी पोलीस स्टेशनला कायमस्वरूपी पीएसआय व चार कर्मचाऱ्यांची मागणी केली. तसेच जिल्हा परिषद शाळा येथे प्रत्येक वर्गामध्ये एलईडी स्क्रीन सिस्टीम बसवून डिजिटल शाळा करण्याच्या सूचना केली.
   नारायण काळे यांनी नागरिकांनी इथून पुढे काम करणाऱ्यां नवीन युवकांना ग्रामपंचायत सत्ते मध्ये  संधी देण्याचे आवाहन केले.  भास्करराव कोकणे यांनी नेहमीच्या शैलित रोखठोक भाषण करत आमच्या काळात कमिशन ५ टक्के वर होते. तर सध्याच्या बॉडीने २५/३०% पर्यंत कमिशन खाल्ल्याचा आरोप केला. कमिशन खाऊन गावात विकास झाला नसल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.
  अनिल बोडखे यांनी ग्रामपंचायत मधील ठराव झाल्यानंतर त्यावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांची पगार वाढ करण्याचे सूचना केली. 
     राजेंद्र कोकणे यांनी ग्रामपंचायतीस जमाखर्चाचा हिशोब मागितला . व गावातील वाड्या वस्तीवरील विहिरींचे पाणी बहुतांश खराब झाल्याने स्वच्छ पाणीपुरवठा करावा व गावच्या महत्वाच्या रस्त्यांना स्ट्रीट लाईट पथदिवे बसवावे अशी मागणी केली.
   सुप्रिया धुमाळ यांनी बस स्टँड आहे त्या जागेत होणार असल्याचे सूतोवाच केले. तसेच ना. राधाकृष्ण विखे हे किरकोळ गाव पातळीवर लक्ष देत नसून काही लोक त्यांच्या नावाचा फक्त वापर करतात असे त्या म्हणाल्या.त्याचप्रमाणे गावामध्ये झालेल्या अतिक्रमण बाबत ग्रामपंचायत गंभीर नसून अनेक वेळा नागरिकांनी तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याबद्दल नाराज व्यक्त केली व आक्रमकपणे  पुराव्यांचा दस्तावेज त्यांनी ग्रामसभेत जनते समोर टाकला. याप्रसंगी बापूसाहेब शिंदे, बाळासाहेब बोडखे यांनी सूचना मांडल्या. ग्रामसभेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. जयकर मगर यांनी केले. सभेचे इतिवृत्त वाचन व नवीन शासकीय योजनांची माहिती व कामाचा लेखाजोखा ग्रामसेवक दादासाहेब भिंगारदे यांनी मांडला. 
ग्रामसभे प्रसंगी , युवा नेते भाऊसाहेब पवार माजी सरपंच भाऊसाहेब मगर,एकनाथ पटारे, तंटामुक्तीचे आबासाहेब रणनवरे, शिवाजी धुमाळ, भाऊसाहेब पटारे,शिवाजी पवार, ग्रा.सदस्य अशोक कचे,भैया पठाण, प्राचार्य शिंदे, जिल्हा परिषदचे मुख्याध्यापक गायकवाड सर, शिक्षक,तलाठी रूपाली रामटेके, प्राथमिक आरोग्य अधिकारी राम बोरुडे,कृषी सहाय्यक आदिनाथ धुमाळ, पशुवैद्यकीय अधिकारी निर्मळ, अंगणवाडी सेवका, आशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments