ग्रामीण भागातील रुग्णांसाठी वरदानडॅा. विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात 'सुपर स्पेशालिटी' ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन.


विजय बोडखे 

राजुरी वार्ताहर : ग्रामीण भागातील रुग्णांना आता हृदयशस्रक्रिया,सांधेरोपण,मूत्रपिंड,यकृत,कॅन्सर,मेंदूविकार,तसेच अवयव ( kidney,Heart,Liver)प्रत्यारोपणासारख्या जटिल शस्त्रक्रियांसाठी शहरांकडे धाव घेण्याची गरज उरणार नाही. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक सुविधांसह सुपर स्पेशालिटी ऑपरेशन थिएटर कार्यान्वित करण्यात आले असून, ही सुविधा ग्रामीण जनतेसाठी मोठी उपलब्धी असल्याचे प्रतिपादन प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी केले.
प्रवरा ग्रामीण रुग्णालयातील या नूतन कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विश्वस्त ध्रुव विखे पाटील, कुलगुरू डॉ. विष्णू मगरे, अधिष्ठाता डॅा सतीश महाजन , रूग्णालय प्रशासनाचे संचालक मेजर जनरल (सेवानिवृत्त ) डॅा.योगिंदर सिंग, रूग्णालयाचे वैदियकिय अधिक्षक डॅा. सुरेश जगदाळे,भूलशास्र विभागप्रमुख डॉ. अक्षय शेट्टी,यांसह वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉ. विखे पाटील यांनी सांगितले की, या केंद्रात एकूण तीन अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरची उभारणी करण्यात आली आहे. येथे केवळ शस्त्रक्रियाच नव्हे, तर अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत. मूत्रपिंड, हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, सांधे बदल, गुडघे आणि हिप जॉईंट शस्त्रक्रियांसाठी सुविधा आहे. या महागड्या शस्त्रक्रिया सर्वसामान्यांच्या आवाक्यात ठेवण्यासाठी रुग्णालयाने शासकिय योजनांची सांगड घातली आहे. महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांअंतर्गत पात्र रुग्णांवर मोफत उपचार केले जातील. जे रूग्ण या योजनेस पात्र नाहीत अशा गरजू रुग्णांवर अत्यल्प दरात शस्त्रक्रिया करण्यात येतील.
या सुविधेमुळे अहिल्यानगर,नाशिक,संभाजीनगर,बीड,पुणे जिल्ह्यासह परिसरातील ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला एक नवी दिशा मिळाली असून, "रुग्णसेवा हाच धर्म" हे ब्रीद प्रवरा परिवाराने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

फोटोमॅटर लोणी- प्रवरा ग्रामीण रुग्णालयात 'सुपर स्पेशालिटी' ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन करताना प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील समवेत विश्वस्त ध्रुव विखे पाटील, कुलगुरू डॉ. विष्णू मगरे,अधिष्ठाता डॉ. सतिश महाजन, रूग्णालय संचालक मेजर जनरल ( सेवानिवृत),वैद्किय अधिक्षक डॅा सुरेश जगदाळे,भूलशास्र विभागप्रमुख डॉ. अक्षय शेट्टी,

Post a Comment

0 Comments