राजुरीस मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची राजुरी गावास विशेष भेट !


विजय बोडखे 

राजुरी (वार्ताहर)
 मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत राहता तालुका पंचायत समितीने विशेष गाव भेट म्हणून राजुरी तालुका राहता येथे भेट दिली. 
राहता पंचायत समिती गट विकास अधिकारी मा. विवेक गुंड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही भेट देण्यात आली. यावेळी राजुरी ग्रामपंचायतच्या प्रांगणामध्ये महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
 होता. कार्यक्रमासाठी गावातील महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या.राहता पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गागरे साहेब,विस्तार अधिकारी कृषी आरगडे साहेब यांनी मार्गदर्शन केले बचत गटाचे रवींद्र खलाटे साहेब यांनी गावातील प्रत्येक महिला ही बचत गटात सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वयंपूर्ण होण्याचे आवाहन केले स्वच्छ भारत अभियानाचे आहेर साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, घातक कचरा, ओला कचरा व सुका कचरा असे कचऱ्याचे विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावणे विषयी मार्गदर्शन केले. प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करून महिलांनी कापडी पिशवीचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आंधोरे मॅडम यांनी महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम यशस्वी करून नारीशक्ती अभियान, बालविवाह प्रतिबंधक शपथ घेतली.

 यावेळी राजुरी उपकेंद्रातर्फे हिमोग्लोबिन तपासणी शिबिर घेण्यात आले.ग्रामस्थांनी महाश्रमदान करून स्वच्छतेचा संदेश दिला.शहीद जवान अनिल गोरे स्मारकाजवळ उभारण्यात आलेल्या आम्ही राजुरीकर या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गावामध्ये मशाल फेरी काढून गाव समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये सहभागी असून प्रत्येकाने या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. महिला बचत गटातर्फे उभारण्यात आलेले ब्युटी पार्लर तसेच झेरॉक्स मशीन यांचेही उद्घाटन करण्यात आले. यावेळी राजुरी ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच सौ संगीताताई पठारे 
उपसरपंच व पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक डॉ सोमनाथ गोरे,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी वैशाली तोडमल मॅडम,विविध पदाधिकारी, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.यावेळी महिलांना वाल म्हणून आंब्याचे रोपे वाटप करण्यात आले आहे .

Post a Comment

0 Comments