राष्ट्रीय सब ज्युनिअर कबड्डी स्पर्धा शिबिरासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील खेळाडूंची निवड

दिलीप लोखंडे 


टाकळीभान प्रतिनिधी :अॅम्यच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया, अॅम्यच्युअर कबड्डी फाउंडेशन महाराष्ट्र व अॅम्यच्युअर कबड्डी असो. ऑफ पुणे यांचे संयुक्त विद्यमानाने 35 वी राष्ट्रीय सब ज्युनिअर कबड्डी क्रीडास्पर्धा 2025 - 26 संत ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनि. कॉलेज आळंदी जि. पुणे येथे दि. 31 जानेवारी ते 02 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
तरी महाराष्ट्र राज्य मुले व मुली कबड्डी संघाचे राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण (शिबीर) हे नाशिक जिल्हा अॅम्यच्युअर कबड्डी असो. च्या वतीने दि. 22 ते 29 जानेवारी 2026 रोजी या दरम्यान मुले व मुली संघ शिवशक्ती क्रीडा मंडळ आडगाव, नाशिक व मुली संघ - श्री. साई स्पोर्ट्स सिडको नाशिक येथे आयोजित केले आहे.
या स्पर्धेसाठी अहिल्यानगर अॅम्यच्युअर कबड्डी असोसिएशन मधील साधना साळवे
 साक्षी साळवे,नंदनी खरात, वेदांत सोनवणे या कबड्डी खेळाडूची शिबिरासाठी निवड झाली आहे तरी जिल्हा संघटन कबड्डी अध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात यांनी निवड झालेल्या खेळाडूंचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments