... महात्मा गांधी हे महान स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी खर्च केले. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. 2 ऑक्टोबर 1869रोजी त्यांचा जन्म गुजरातच्या पोरबंदर मधील एका हिंदू कुटुंबात झाला. त्यांचे वडील करमचंद गांधी हे पोरबंदर राज्यात दिवाण म्हणून काम करत असत.वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी गांधीजींचे लग्न कस्तुरबा कपाडिया यांच्याशी झाले.
त्यावेळी कस्तुरबा या अवघ्या तेरा वर्षाच्या होत्या. त्यानंतर त्यांना कस्तुरबा गांधी या नावाने ओळखले जाऊ लागले..राजकोट येथे शालेय शिक्षण घेतल्यानंतर 1887 साली गांधीजींनी मेट्रिक ही परिक्षा पास केली. नंतर उच्च शिक्षणासाठी त्यांना परदेशात जावे लागले. परंतु आपला मुलगा परदेशात शिक्षणासाठी गेला तर तो इतर मुलांच्या संगतीने बिघडून जाईल अशी भीती गांधीजींच्या आईला वाटत होती.म्हणून सुरुवातीला गांधीजींच्या आईने परदेशात जाण्यासाठी त्यांना विरोध केला. परंतु महात्मा गांधीजी हे अतिशय जिद्दी वृत्तीचे होते. त्यांचा स्वतःवर विश्वास होता. म्हणून त्यांनी आपल्या आईला सांगितले की "आई मी तुझी शपथ घेऊन सांगतो ^की परदेशात गेल्यानंतर मी कदापिही वाईट वर्तन करणार नाही.अशा प्रकारचे वचन महात्मा गांधीजींनी आपली आई पुतळी बाई यांना दिले. म्हणून गांधीजी बॅरिस्टर होऊन भारतात परत आले. त्यानंतर महात्मा गांधीजींना एका अतिशय महत्त्वपूर्ण खटल्यासाठी तातडीने दक्षिण आफ्रिकेत जावे लागले. तिथे गेल्यानंतर आपल्या भारतीय जनतेला किती निष्ठूर आणि अपमानास्पद वागणूक दिली जाते हे महात्मा गांधीजींनी अगदी जवळून पाहिले. त्या काळामध्ये मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूंवर इंग्रजसरकारने कर लादले होते. मिठासार ख्या या जीवनावश्यक वस्तूवरील कर रद्द करण्यासाठी महात्मा गांधीजींनी 12 मार्च 1930 रोजी मिठाचा सत्याग्रह मोठ्या प्रमाणात घडऊन आणला. दांडी यात्रा काढली. महात्मा गांधीजींच्या या मिठाच्या सत्याग्रहांमध्ये अनेक देशभक्त बहुसंख्येने सामील झाले होते. महात्मा गांधीजी हे सत्य आणि अहिंसेचे पुजारी होते.ब्रिटिशांच्या दडपशाहीला न घाबरता मोठ्या हिमतीने त्यांनी 8 ऑगस्ट 1942 ला इंग्रज कार्यकर्त्यांना खडसावून सांगितले की^इंग्रजांनो चले जाव-, आमच्या देशात थांबू नका. चालते व्हा.^असे खडसावून सांगितले.आपल्या सर्व राष्ट्र भक्तांना त्यांनी^करा किंवा मरा^ असा संदेश दिला. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी महात्मा गांधीजींना राष्ट्रद्रोही ठरवून अनेकदा तुरुंगात पाठवले.. महात्मा गांधीजींचा असा विश्वास होता की^अखेर विजय सत्याचाच होणार आहे .अशा प्रकारचा ठाम निर्धार त्यांनी आपल्या अंतरी बाळगला होता
. महात्मा गांधीजींच्या चळवळीत तन मन धन झोकुन काम करणारी लाखो कार्यकर्ते भारत देशामध्ये निर्माण झाले होते. अशा या थोर कार्याचे बाबतीत तर भारत देश हा कार्यकर्त्यांची खान आहे. असे स्वतः गांधीजी म्हणत असे.^संपूर्ण भारतीय जनता आपल्या पाठीशी उभी आहे. प्रसंगी स्वातंत्र्य लढ्यासाठी बलिदान करण्याची तयारी देखील भारतीयांची आहे व राहील अशा प्रकारची खात्री महात्मा गांधीजींची होती.महात्मा गांधीजी मुलांना ^नेहमी खरे अरे बोला. एक दुसऱ्याशी प्रामाणिक रहा. खुप कष्ट करा. खुप शिका. अन्यायाचा प्रतिकार करण्याची तयारी ठेवा. असा मोलाचा संदेश महात्मा गांधीजींनी संपूर्ण भारतीय जनतेला दिला होता. दिवस रात्र भारतीयांची काळजी घेणारे महात्मा गांधीजी 30 जानेवारी 1948 रोजी सायंकाळचे वेळी नित्य नियमाप्रमाणे प्रार्थनेला जात असताना एका माथेफिरूने महात्मा गांधीजींना गोळी घातली. गोळी लागताच क्षणी महात्मा गांधीजी धारातीर्थी कोसळले व ^हे राम,^ असा शब्द उच्चारून महात्मा गांधीजी अनंतात विलीन झाले.
महात्मा गांधीजींच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने मी माझ्या सर्व देश बांधवांना व भगिनींना नम्रपणे सुचित घरी इच्छितो की-भारत देशाला स्वातंत्र्य मिळविण्या कामी या महात्मा गांधीजीं सारख्या राष्ट्रपुरुषांनी अनेक खस्ता खाल्या आहेत.. स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्रे ठेवून स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊन आपणाला म्हणजे भारत देश्याला ब्रिटिशांच्या जो खडा तून मुक्त केले आहे. म्हणून या पवित्र अशा भारत देशाचे रक्षण करण्याकरिता आपण सर्वांनी एकजुटीने एकत्र सतत एकत्र राहावे.. आपापसातील वैरभाव असतील तर ते विसरून जावे आणि आपल्या मुलांना खूप शिकवावे. की जेणेकरून ही तरुण पिढी शिक्षण घेऊन मोठी होईल व मोठमोठ्या मानाच्या जागा संपादन करतील म्हणजेच पर्यायाने काही अंशी का होईना त्यांच्या हातून देश सेवा घडल्याशिवाय राहणार नाही असे माझे प्रामाणिक मत आहे. त्याचबरोबर मी सध्याच्या या तरुण वर्गाला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की ^आई-वडिलांची सेवा करा.^ ^वृद्धावस्थेत त्यांची मने दुखवू नका.^वृद्धावस्था एक प्रकारचे बालपण असते म्हणून त्यांचा द्वेष करू नका .त्यांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करा. सर्वांशी प्रेमाने वागा. वाईट वर्तन करू नका. वाहने वेगाने चालवू नका. °^अति घाई संकटात नेई ! नाहीतर.,^^ संसार केला कोट्यान कोटी; आणि मेल्यावर संग येईना लंगोटी^अशी आपली अवस्था झाल्या शिवाय राहणार नाही हे मात्र विसरू नका
.^एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ^ या उक्तीप्रमाणे आचरण ठेवा.
अशा प्रकारचे वर्तन आपण केले तरच खऱ्या अर्थाने या राष्ट्रपुरुषास आदरांजली वाहिली आहे असे माझे प्रामाणिक मत आहे
^जय हिंद^
मा. प्रा ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे सर
(एम ए.बी एड)
साकुरी. ता. राहता. जिल्हा =अहिल्या नगर
मो 9604797316
0 Comments