श्रीक्षेत्र भऊर ते त्र्यंबकेश्वर या दिंडी सोहळाचे भऊरला परत आल्यानंतर विना पूजनाने शुक्रवारी होणार सांगता!

शिर्डी (प्रतिनिधी)-
दर वर्षी श्रीक्षेत्र भऊर ते श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही हा श्रीक्षेत्र भऊर ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात हभप संजयजी महाराज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

त्रिंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त या दिंडी सोहळ्याचे दरवर्षी आयोजन करण्यात येते .हा दिंडी सोहळा त्रिंबकेश्वर येथे पायी जाऊन तेथे दर्शन घेऊन व एकादशीच्या दुसऱ्या दिवशी काल्याचे किर्तन झाल्यानंतर परत गावी आल्यानंतर शुक्रवार दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी सकाळी दहा वाजता या पायी दिंडी सोहळ्याचा समारोप विना पूजनाने होणार आहे.
प्रथम शुक्रवार दिनांक 30 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता भऊर गावातील श्री रोकडेश्वर हनुमान महाराज मंदिरापासून टाळ मृदुंगाच्या गजरात पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर पालखी व विना पूजन होणार आहे. दहा वाजता हभप संजयजी महाराज जगताप भऊरकर यांचा प्रवचनाचा कार्यक्रम बाळासाहेब पुंडलिक पाटील जगताप यांच्या वस्तीवर होणार असून प्रवचना नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे .बाळासाहेब पुंडलिक जगताप व मेजर दीपक बाळासाहेब जगताप यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी दिंडीतील सर्व वारकरी, भजनी मंडळ, गावातील ग्रामस्थ व भाविकांनी या प्रवचनाचा व महाप्रसादाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा .असे आवाहन महाप्रसाद अन्नदाते बाळासाहेब पुंडलिक पाटील जगताप यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments