असे सांगत देह जाणारच आहे ,मात्र या जीवनात केलेली कीर्ती कायम राहणार आहे. तेव्हा जीवनात चांगलं काम केलं पाहिजे. असे हभप उद्धव महाराज मंडलिक यांनी म्हटलं आहे.
राहाता तालुक्यातील अस्तगाव येथील कै. भिमाजी गोपाळा नळे पा. यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त आयोजित कीर्तनात ह भ प उद्धव महाराज मंडलिक यांनी महाभारतातील विविध उदाहरणे तसेच सत्य परिस्थितीतील दाखले देत कीर्तनातून उपस्थितांना प्रबोधन केले. मनुष्य किती जगला हे महत्त्वाचे नसून तो कसा जगला हे महत्त्वाचे आहे.आज तरुण पिढीला सुसंस्काराची, चांगल्या विचारांची गरज आहे. जुन्या पिढीने दिलेले विचार नव्या पिढीने जोपासले पाहिजे.असे सांगत त्यांनी कै. भिमाजी पाटील यांनी अस्तगाव ग्रामपंचायत मध्ये पंधरा वर्षे सेवा दिली , अस्तगाव न्यू इंग्लिश स्कूल येथेही त्यांनी कमिटीवर राहून काम केले.तसेच 35 वर्ष श्री गणेश सहकारी साखर कारखान्यात नोकरी केली. कष्ट मेहनत करून सुसंस्कृत पिढी घडवली. त्यांचे विचार, संस्कार पुढे घेऊन जाण्याचे काम तसेच त्यांची माणुसकी ,नातेसंबंध सांभाळण्याचे काम त्यांचे मुले व सर्व परिवार करत आहे. त्यांचे मुले व परिवाराला त्यांचे आशीर्वाद रहो, असे सांगत त्यांनी आदर्श व्यक्तिमत्व असणाऱ्या कै. भिमाजी पाटील नळे यांना प्रथम पुण्यस्मरणा निमित्त श्रद्धांजली अर्पण केली. कीर्तनानंतर नारायण कार्ले पाटील यांनीही हभप उद्धव महाराजांनी जे विचार आज येथे महाभारतातील विविध उदाहरणे देऊन दिले ते हल्लीच्या पिढीला खूप गरजेचे आहे. असे सांगत कै. भिमाजी पाटील यांनी गणेश कारखान्यात पस्तीस वर्ष सेवा केली .ते अस्तगाव येथून गणेश कारखान्यात पायी येत -जात होते .अशी येथे माहिती मिळाली.असे त्यांचे कष्ट व मेहनत यामुळेच ते 90 वर्षे जगले. त्यांचा नातू वकील असून सर्व कुटुंब सुसंस्कृत व सुशिक्षित आहे. हेच कै. भिमाजी पाटील यांचे कुटुंबावर संस्कार आहेत. असे त्यांनी सांगितले व कै. भिमाजी पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली. तर यावेळी डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनीही कै.भिमाजी पाटील यांचे विचार मुले, नातू पुढे नेत आहेत .असे सांगत कै. भिमाजी पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.भास्कर भिकाजी निळे पा. (मुलगा) , ग.भा. दगुबाई साहेबराव पा. गुडघे ,(बहिण), ग.भा.संजीवनी अविनाश रोहमारे (मुलगी) सौ मंदाताई कारभारी पाटील शेळके (मुलगी) कारभारी दादा शेळके (जावई) ,सौ सुरेखा भास्कर नळे (सून) चिरंजीव सागर भास्कर नळे( नातू) चिरंजीव रवींद्र भास्कर नळे (नातू )चिरंजीव प्रवीण भास्कर नळे (नातू) महेंद्र अविनाश रोहमारे( नातू,) प्रसाद कारभारी शेळके( नातू) आदींसह नळे कुटुंबातील सदस्य, परिवार, नातेवाईक, ग्रामस्थ, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments