वाकडी (प्रतिनिधी)
अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.
पत्रकात शेळके यांनी म्हटले आहे की यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिके सोयाबीन कापूस मका फळबागा ऊस व इतर पिके उध्वस्त झाली शासनाने तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली त्यातदेखील काही शेतकरी वंचित आहेत आज शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे अजूनही विमा कंपनी विमा देण्यासाठी तयार नाही दरवर्षी खरीप हंगामातील पिकांचा विमा हा रब्बी हंगामातील पिके उभी करण्यासाठी शेतकऱ्यांना विमा रक्कम देण्याचा नियम आहे शिवाय यावर्षी अतिवृष्टीमुळे शंभर टक्के नुकसान झाले आहे त्यामुळे विमा रक्कम ही जास्तीत जास्त म्हणजे सोयाबीन कापूस मका यांना हेक्टरी 35000 हजार व फळबागांना हेक्टरी 75000 हजार रुपये देण्यात यावी कारण दहा वर्षीत विमा कंपनीना हजोरो कोटी रुपये नफा झाला आहे महाराष्ट्र राज्यात लोकप्रतिनिधी आमदार खासदार मंत्री यांचा वचक नसल्याने सातत्याने विमा कंपनी शेतकऱ्यांना कमी प्रमाणात विमा रक्कम देते यावेळी तसे झाल्यास शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन केले जाईल व न्यायालयात विमा कंपनी यांच्यावर खटला दाखल केला जाईल असा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीने विठ्ठलराव शेळके यांनी दिला आहे तरी आठ दिवसांत जास्तीत जास्त स्वरुपात विमा रक्कम शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात जमा करावी अशी मागणी शेतकरी संघटना व विमा धारक शेतकरी बंधू भगिनींनी यांनी केली आहे.
0 Comments