सुभाष चंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी कटक येथे झाला .त्यांचा शालेय जीवनापासून देशभक्तिकडे कल होता. महाविद्यालययीन शिक्षण चालु असल्यापासून इंग्रजी सत्तेविरुद्ध लढा देण्याचा सतत प्रयत्न करीत होते.
अपल्या वडिलांच्या इच्छेनुसार आय सी एस होण्याचे स्वप्न उरी बाळगून ते इंग्लंडला गेले. त्या ठिकाणी आय सी एस परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले. शिक्षण घेऊन भारतात परत आल्यावर सुभाष बाबू सनदी अधिकारी म्हणून नोकरी करू लागले. त्याचं काळात महात्मा गांधी यांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध लढा पुकारला. आणि या महात्मा गांधीजी यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून सुभाष चंद्र बोस यांनी 22 एप्रिल 1921 रोजी सरकारी नोकरीतील अत्यंत मानाच्या जागेचा त्याग करून या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेऊन इंग्रजी सत्तेविरुद्ध बंड पुकारले.
... स्वातंत्र्य संग्रामात भाग घेण्यासाठी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा देणारे ते पहिले आय सी एस अधिकारी म्हणून ओळखले जातात. या पुढील काळात तर सुभाष चंद्र बोस यांनी स्वतला देशसेवेसाठी वाहून घेतले. सुभाष चंद्र बोस यांचे विचार प्रथम पासूनच क्रांतिकारी असे होते. त्यांच्या या क्रांती कारी विचारामुळे सण 1926 नंतर राष्ट्रीय पातळीवरील नेते म्हणून त्यांना मान्यता मिळाली. देशातील युवक वर्गात ते अतीशय लोकप्रिय झाले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तरुण नेत्यांमधे त्यांना महत्वाचे स्थान मिळाले. सुभाष बाबू चंद्र बोस यांनी स्वतः ला सर्वस्वी देशसेवेलाच वाहून घेतले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यात ते भाग घेऊ लागले.सुभाष बाबू यांचे शालेय शिक्षण कलकत्ता येथे झाले. जरी झाले असले तरी उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. तेथे कठोर परिश्रम करत त्यांनी आय सी एस ही परीक्षा पास केली. परंतू ज्या इंग्रजांनी माझ्या या भारत देष्यावर राज्य केले. ज्यांनी माझ्या देशबांधवांना गुलाम बनवल आहे. त्यांची नोकरी=चाकरी करायची नाही. अशी खूण गाठ मनी बाळगली होती. म्हणूनच चालून आलेल्या नोकऱ्या देखिल त्यांनी सोडुन दिल्या.
परकियांच्या नोकऱ्या करायच्या नाही.तर आपल्या देशात जाऊन आपला देश. आपले देशबांधव यांच्यासाठी. काही करायच. असा उद्दात दृष्टीकोण डोळ्यासमोर ठेऊन सुभाष बाबू भारतात परत आले. आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील संग्रांमात त्यांनी हिरीरीने भाग घेऊन इंग्रजी सत्तेविरुद्ध लढा पुकारला.त्यांनी देशबंधू चित्तरंजन दास यांच्या नेतृत्वाखाली काही दिवस कार्य केले. अनेक वेळा त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.एकदा तर एका राष्ट्रद्रोही खटल्यात त्यांना शिक्षा ही झाली. आणि इंग्रज अधिकारी यांनी त्यांची रवानगी ही ब्रम्हदेशातील मंडाले कारागृहात केली.. इतकेच नव्हे तर ज्या कोठडीमध्ये लोकमान्य टिळक यांना ठेवले होते. त्याचं कोठडीत रहण्याचे भाग्य हे सुभाष बाबू यांना मिळाले. कलकत्ता काँग्रेस चे वेळेला ते राष्ट्रीय स्वयंसेवक दलाचे प्रमुख होते. नंतर काही वैचारिक मतभेदांमुळे तेथून ते बाहेर पडले व ^फॉरवर्ड ब्लॉक^ या एका नव्या पक्षाची स्थापना केली..आपल्या या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेऊन इंग्रजी सत्तेविरुद्ध लढा देण्याचा प्रयत्न हा त्यांचा यशस्वीच होत गेला..
आणि याच काळात महायुद्धाचे पारडे फिरण्यास सुरुवात झाली. जर्मनी; जपान यांची निरनिराळ्या आघाड्यांवर माघार होऊ लागली. त्या मुळे आझाद हिंद सेनेलाही माघार घ्यावी लागली. जपान सरकारच्या निवेदनानुसार सुभाष बाबू यांना एका विमानाने टोकियोला जाण्यास निघालेअसताना त्या विमानाला फॉर्मोसा म्हणजेच ताईहोकु बेटावरील विमानतळावर अपघात झाला
या अपघातात 18 ऑगस्ट 1945 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा दुर्दैवी अंत झाला.
अश्या या थोर महापुरुषास मी अती नम्र पणे अभिवादन करतो.
या थोर क्रांतिकारकांच्या जयंती निमित्त मी माझ्या सर्व मित्रांना आणि बंधू भगिनींना नम्र पने सूचित करू इच्छितो की... कृपया खूप खूप शिका. संघटित व्हा. आणि विचारांचा संघर्ष करा. आपल्या आई वडिलांची सेवा करा.. सर्वांशी प्रेमाने वागा.. गर्व करू नका. इतरांना कमी समजू नका. किँमत करू नका. हे सर्व काही इथेच राहणार आहे. थोडक्यात^^< सौंसार केला कोट्यानकोटी ; मेल्यावर संगयेईना लंगोटी ^ अशी आपली अवस्था झाल्या शिवाय राहणार नाही याचा ही विसर पडू नये.. समाज कार्य करत रहा. यातून आत्मिक समाधान मिळणारे आहे. नाहीतर.^<जन्माला आला हेला-आणि पाणी वाहता; वाहता मेला.^असे होऊ नये ही एक अपेक्षा उरी बाळगून हा सुभाष बाबू यांचा लेख समर्पित करतो.
थोडक्यात*=एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्ती प्रमाणे आचरण करावे.असे मी माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना नम्र पने सूचित करू इच्छितो
जयहिंद.
From. मा. प्रा ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे सर. (एम ए.बी एड) साकुरी.ता.राहता.जिल्हा.अहिल्या नगर
मो.9604797316
0 Comments