अहिल्यानगर( जिल्हा प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करा अन्यथा भिल्ल समाजाच्या आंदोलना ला सामोरे जाण्याची तयारी ठेवा असा इशारा एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी उपवन संरक्षक अधिकारी अहिल्यानगर यांना दिला आहे.
जिल्हा वनाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात श्री.अहिरे यांनी म्हटले आहे की, श्री क्षेत्र पिंपळदरी ता.अकोले येथील येडू मातेची यात्रा चैत्र
पौर्णिमेला मोठ्या थाटात भरते संपूर्ण राज्यातून भिल्ल समाज लाखोच्या संख्येने उपस्थित असतो परंतु यात्रा वन विभागाच्या जागेत भरत असतानाही स्थानिक शेतकरी व आदिवासी यांच्यामध्ये जागेवरून वाद निर्माण होतात त्यामुळे यात्रेतील शांतता भंग होते व नेहमीच यात्रेवेळी संघर्ष निर्माण होतो त्यामुळे एकलव्य भिल्ल सेना या आदिवासी संघटनेने सदर यात्रेवेळी यात्रा परिसर राखीव करावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. सदर क्षेत्र वनविभागाच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी उपसंरक्षक अधिकारी अहिल्यानगर यांना पत्र पाठवून सदर प्रकरण मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी त्वरित करावी व येडू माता गड परिसर यात्रेवेळी राखीव करावा म्हणजे यात्रेवेळी संघर्ष होणार नाही व आदिवासींना यात्रेमध्ये अडचणी येणार नाहीत. वनविभागाने त्वरित निर्णय घ्यावा व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करावी अन्यथा वन विभागाने जाणीवपूर्वक आदिवासींच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास जिल्ह्यात आदिवासी उग्र स्वरूपाचे आंदोलन उभे करतील व यात्रेवेळी जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्यास उपवन संरक्षक अधिकाऱ्यांसह संबंधित सर्व अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा ज्ञानेश्वर अहिरे यांनी दिला आहे.
0 Comments