आई-वडिलांच्या सेवेचं पुण्यचं भविष्यात येतं कामा -- ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर

शिर्डी (प्रतिनिधी)-
आई-वडिलांची सेवा भविष्यात नक्कीच कामा येते. संकटात तेच पुण्य कामी पडते. चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ मिळतं. वाईट कर्म केलं तर वाईटच फळ मिळणार..! असं ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी म्हटल आहे.

   सावळीविहीर येथे हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी कै. साहेबराव बाबुराव जपे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त आयोजित कीर्तनात ते बोलत होते. आपल्या विनोदी शैलीमध्ये त्यांनी अनेक दाखले देत अध्यात्मिक प्रबोधन केले. त्यांनी यावेळी कीर्तनात निरूपण करताना सांगितले की, मनुष्य येताना काही घेऊन येत नाही व जाताना काही नेत नाही .सर्व जागेवर राहते. आत्मा हा कधी जात नाही व येत नाही. शरीरातील फक्त श्वासरूपी चैतन्य जाते. त्यासाठी आपल्या श्वासातून नामस्मरण केलं गेलं पाहिजे. तेच काम येतं.ज्यांनी आपल्या जीवनात काहीतरी कीर्ती केली. त्याचे नाव राहतं. त्याचे कौतुक होत असतं. कोणतीही अवैध मार्गाने मिळवलेली संपत्ती ही वैध मिळवलेल्या संपत्तीपुढे टिकत नाही. प्रत्येकाच्या जीवनात लग्न, पैसा, जन्म, मरण हे नियोजित ठरलेल्या वेळेतच होत असते कुणी काही केलं तरी त्यात बदल होत नाही. हे ईश्वर लिखित आहे. सत्ता, संपत्ती ही वेळेला रोखू शकत नाही. त्यामुळे जीवनात अवैध रीतीने सत्ता, संपत्ती मिळवण्यापेक्षा नामस्मरण करून मिळणारे समाधान मोठे असते. असेही त्यांनी अनेक दाखले देत आपल्या विनोदी शैलीमध्ये कीर्तनात निरूपण केले.
कीर्तनानंतर त्यांचा सतीश तुकाराम जपे व‌ सागर साहेबराव जपे,व परिवारातील सदस्यांनी पुष्पहार देऊन सन्मान केला. यावेळी ग.भा. सविता साहेबराव जपे, सौ मंजुषा जपे, ,कु ओवी जपे, अधिराज जपे,विठ्ठलराव जपे, माधवराव जपे, वामनराव जपे, सौ लीलाबाई चोळके, शिलाबाई बाभुळके , किरण भारत, स्वप्निल, वृषाल, चेतन जपे ,आदीसह पुतणे ,नातू , ग्रामस्थ, महिला व जपे परिवारातील सदस्य ,नातेवाईक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments